पुणे

धनादेश अनादरप्रकरणी एकावर प्राणघातक हल्ला

CD

जुन्नर, ता. १० : सावरगाव (ता. जुन्नर) येथील पाबळवाडीत धनादेश अनादर (चेक बाऊन्स) प्रकरणी न्यायालयात खटला दाखल केल्याच्या रागातून एकावर दगड आणि चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही घटना गुरुवारी (ता. ९) सायंकाळी घडली. याप्रकरणी ऋषिकेश काळुराम भगत (रा. खानापूर) याच्यावर जुन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाजीराव बापूराव पाबळे यांनी फिर्याद दिली आहे. पाबळे आणि भगत यांच्यात आर्थिक देवाणघेवाण झाली होती. भगत याने दिलेला धनादेश न वटल्याने पाबळे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. याचा राग मनात धरून भगतने १५ दिवसांपूर्वी पाबळे यांना फोनवरून दमदाटी केली होती. गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पाबळे सावरगाव ते पाबळवाडी मार्गावरून दुचाकीने जात असताना, चोहंडीच्या ओढ्याजवळ भगतने त्यांच्या डोक्यात दगड मारला आणि चाकूने जीवघेणा हल्ला केला. जुन्नर पोलिस तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 ORANGE CAP: वैभव सूर्यवंशीची ऑरेंज कॅपच्या शर्यतीत गरुड झेप! विराट कोहली, रोहित शर्मा टॉप फाईव्हमध्येही नाहीत...

RR vs RCB Live : शाब्बास वैभव... राजस्थानचा विजयी चौकार, विराटच्या रॉयल्सचा केला कचरा; IPL 2026 Point Table मध्ये दबदबा

RR vs RCB Live : १५ चेंडूंत ७४ धावा चोपल्या... Vaibhav Sooryavanshi च्या वादळासमोर गतविजेत्यांचा पालापाचोळा; ध्रुव जुरेलसोबत ८ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

Local Megablock: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! रविवारी मुंबई लोकलच्या ‘या’ मार्गांवर जंबो ब्लॉक; वेळापत्रकात फेरबदल जाहीर

RR vs RCB Live : ४,४,४,६,६... वैभव सूर्यवंशीचे १५ चेंडूंत अर्धशतक; ३००+ चा स्ट्राईक रेट अन् जोश हेझलवूड, भुवनेश्वर कुमारची बेक्कार धुलाई

SCROLL FOR NEXT