जुन्नर, ता. २० : अलदरे (ता. जुन्नर) येथील मुलगा मयूर घोगरे याची पुणे शहर पोलिस दलात निवड झाली आहे. हलाखीच्या परिस्थितीवर मात करत मयूरने तिसऱ्या प्रयत्नात यश मिळवून आई-वडिलांचे स्वप्न साकार केले. मयूरचे वडील रघुनाथ व आई सुनीता घोगरे शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. कौटुंबिक परिस्थिती बेताची असतानाही त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी कष्ट घेतले. मयूरचे प्राथमिक शिक्षण अलदरे येथील जिल्हा परिषद शाळेत, तर महाविद्यालयीन शिक्षण जुन्नरच्या श्री शिवछत्रपती महाविद्यालयात झाले. पोलिस भरतीच्या पहिल्या दोन प्रयत्नात अपयश आल्यानंतरही खचून न जाता त्याने सराव सुरू ठेवला. अखेर तिसऱ्या प्रयत्नात त्याला यश मिळाले. ठाकर समाजातील मयूरच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्याचे अभिनंदन होत आहे.
03488
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.