पुणे

जुन्नरमध्ये उद्या सांस्कृतिक महाउत्सव

CD

जुन्नर, ता. ६ : महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागातर्फे गुरुवारी (ता. ७) जुन्नरमध्ये महाराष्ट्राची लोकधारा आणि वारकरी चित्ररथ दिंडीचे आयोजन केले आहे. आमदार शरद सोनवणे यांनी या विशेष महोत्सवासाठी साडेनऊ लाखांचा निधी मंजूर झाल्याची माहिती दिली.
किल्ले शिवनेरीवर २७ एप्रिल १९६० रोजी झालेल्या मंगल कलश पूजनाच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी हा सोहळा होत आहे. गुरुवारी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत सिद्धिविनायक मंदिर ते गणपती विसर्जन मार्गावर वारकरी चित्ररथ दिंडी निघणार आहे. त्यानंतर धान्यबाजार येथे ‘द फोक महाराष्ट्राची लोकधारा’ हा कार्यक्रम होईल. सह्याद्री गिरीभ्रमण संस्था आणि कलोपासक संस्थांच्या मागणीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमाला तात्काळ मान्यता दिली आहे.


महाराष्ट्राच्या जडणघडणीचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने सह्याद्री संस्थेने मांडलेल्या प्रस्तावास मुख्यमंत्र्यांनी अनुमती दिली. आमदार सोनवणे यांच्या पुढाकारामुळे हा महोत्सव आता दरवर्षी साजरा होणार आहे.
-राहुल जोशी, अध्यक्ष, सह्याद्री गिरिभ्रमण संस्था, जुन्नर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPSC परीक्षेत AI ची एंट्री! 569 उमेदवारांचे अर्ज थेट फेटाळले, कारण वाचून धक्का बसेल... पूजा खेडकर प्रकरणानंतर मोठा निर्णय

Pune Health: पुण्यात खळबळ! खेड-शिवापूर आरोग्य केंद्रातील औषध वितरणात निष्काळजीपणा उघड; आरोग्य केंद्रात चूक महागात

मध्य रेल्वेवर आणखी १२ एसी फेऱ्या, प्रतिसाद वाढल्यानं निर्णय; साध्या लोकलला फटका?

Whatsapp Scam : बॉसच्या नंबरवरून मेसेज अन् बँक अकाऊंट रिकामं! भारतात नव्या व्हॉट्सॲप स्कॅमचा सुळसुळाट, 'या' लोकांना केलं जातय टार्गेट

Cotton Sowing Delay : कापसाला मिळणार 8,600 रुपये हमीभाव; यंदा 20 टक्के उत्पादन घटण्याची शक्यता, शेतकऱ्यांचे भवितव्य पावसावर अवलंबून

SCROLL FOR NEXT