पुणे

क्रांतिकारकांच्या प्रतिमांचे केवाडी शाळेत पूजन

CD

जुन्नर, ता. ९ ः जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील केवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते, अशी माहिती मुख्याध्यापिका संगीता चव्हाण यांनी दिली.
यावेळी आदिवासी समाजाच्या उद्धारासाठी कार्य केलेल्या क्रांतिकारकांच्या प्रतिमांचे पूजन सरपंच वेणूताई लांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्ताने आदिवासी महाराष्ट्र विचार मंच आणि ब्रिगेड सह्याद्री मंच यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांच्या रंगभरण स्पर्धा आणि निबंध स्पर्धा पार पडल्या. विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमांचे उपस्थितांनी कौतुक केले. तर वैभवी ज्ञानदेव लांडे, आरोही लालू लांडे, वैभव तुकाराम लांडे, समरजीत रघुनाथ लांडे या विद्यार्थ्यांनी आदिवासी दिनाचे महत्त्व, क्रांतिकारकांचे योगदान आपल्या भाषणातून उलगडले. गटशिक्षणाधिकारी अशोक लांडे यांनी या उपक्रमानिमित्त शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी तंटामुक्ती अध्यक्ष जयराम लांडे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सीताबाई लांडे, फसाबाई लांडे, स्वाती लांडे, लहू लांडे, रवी लांडे, सुनील लांडे, आशा निर्मळ यांसह विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन शिक्षिका प्रमिला निचित यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune University : पुणे विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! भोजनगृहाची दरवाढ रद्द, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT