पुणे

बावडा येथे उद्या शेतकरी मेळावा

CD

बावडा, ता. ४ : बावडा (ता. इंदापूर) येथे ऊस उत्पादकांसाठी शनिवारी (ता. ६) सायंकाळी सहा वाजता बाजारतळ पटांगणावर शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साखर कारखान्यांनी योग्य, रास्त व न्याय्य एफ आरपीची पहिली उचल द्यावी व ऊसदराबाबत शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय होऊ नये, यासाठी शेतकरी संघर्ष समितीने पुढाकार घेतला आहे.
मेळाव्यास शेतकरी नेते रघुनाथ दादा पाटील, लक्ष्मणराव वडले, शिवाजीराव नांदखिले हे मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती विजय गायकवाड, पंडितराव पाटील, तुकाराम घोगरे यांनी दिली. मेळाव्यात शेतकरी संघर्ष समिती, शेतकरी संघटना (राजू शेट्टी), शरद जोशी विचार मंचचा समावेश आहे तरी या मेळाव्यास शेतकरी बांधवांनी उपस्थित राहावे,, असे आयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, ऊस उत्पादकांची पिळवणूक करून कारखानदाराने स्वतःचे खिसे भरू नयेत यासाठी शेतकऱ्यांनी स्वतः आपल्या न्याय्य व कायदेशीर हक्कासाठी सतर्क, सावध व जागरूक राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सिलिंडरचा काळाबाजार! एकाच घरात सापडले विविध कंपन्यांचे ४० सिलिंडर अन् २३ रेग्यूलेटर, गुन्हे शाखेची कारवाई...

Numerology : 'या' 3 मूलांकाचे लोक सगळ्यात जास्त खोटं बोलतात; स्वार्थापायी करतात दुसऱ्यांचे नुकसान, सहज कुणालाही फसवण्याची वृत्ती

गॅस कनेक्शन बंद करण्याची भीती; डोंबिवलीत महिलेला ३ लाखांचा गंडा, ‘महानगर गॅस’च्या नावाने फसवणूक

BMC रोज पाणीपुरवठा करते, तरीही मुंबईला पाणी कमी का पडते? मोठे स्पष्टीकरण देत महायुती सरकारने सांगितली खरी कारणे

Santosh Deshmukh Case: ऐनवेळी प्लॅन बदलला! संतोष देशमुख प्रकरणातील आरोपीला १० कमांडोंच्या गराड्यात गावात नेलं अन्...

SCROLL FOR NEXT