पुणे

वकीलवस्ती शाळेच्या जागेवरील अतिक्रमणे जमीनदोस्त

CD

बावडा, ता. ९ ः वकीलवस्ती (ता. इंदापूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मालकीच्या गट क्रमांक १७०मधील ०.५१ क्षेत्रावरील अतिक्रमणांवर ग्रामपंचायतीने अखेर धडक कारवाई करत सुमारे २० अतिक्रमणे हटविली. त्यामुळे शाळेच्या आवाराने मोकळा श्वास घेतला असून, रखडलेली अंगणवाडी व शाळेच्या विविध सुविधांची कामे मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
शाळेच्या जागेवर अनेक नागरिकांनी अतिक्रमण करून घरे बांधल्याने नवीन शौचालय तसेच केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या अंगणवाडीच्या नवीन इमारतीसाठी जागा उपलब्ध होत नव्हती. मागील दोन वर्षांपासून निधी मंजूर होऊनही जागेअभावी बांधकाम रखडले होते.
ग्रामपंचायतीकडून अतिक्रमणधारकांना वेळोवेळी नोटिसा व सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, नोटिसा देऊनही अतिक्रमणे न हटविल्याने ग्रामपंचायतीने नियमानुसार कारवाईचा निर्णय घेतला. गटविकास अधिकारी सचिन खुडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत अधिकारी अंबिका पावशे, सरपंच वनिता भोसले, सरपंच वर्षा धुमाळ, सदस्य रोहन कोळेकर, उदय घोगरे, गटशिक्षण अधिकारी पांडुरंग कोळेकर, विस्तार अधिकारी निकत तसेच गावातील युवकांच्या सहकार्याने अतिक्रमणे हटविण्यात आली.
मोकळ्या झालेल्या जागेवर अंगणवाडी इमारत, शाळेचे शौचालय, हँडवॉश स्टेशन, ग्रामपंचायतीची विस्तारित इमारत आणि खुली व्यायामशाळा उभारण्याचे नियोजन ग्रामपंचायतीने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घरासमोर खेळत होती चिमुकली, आईच्या डोळ्यादेखत कारनं चिरडलं; २ सेकंदात श्वास थांबला, घटना CCTVत कैद

Pune waste Management: बीपीसीएल तयार, पण पुणे महापालिकेसमोर १२ एकर जागेचा पेच; कचऱ्यापासून गॅस प्रकल्पाला बायोमायनिंगचा अडथळा

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

Marathi News Live Updates : जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित करावं- प्रसाद लाड

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT