pune rain Sakal
पुणे

Pune Rain News : मुळशी तालुक्यात पावसाची संततधार, बंधारे भरण्याच्या मार्गावर

रिहे, पिंपळोली, घोटावडे, लव्हार्डे, वांजळे, आंदगाव येथील बंधारे भरले

सकाळ वृत्तसेवा

भुकूम : मुळशी तालुक्यात मागील काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे नदी व ओढ्यावरील बहुतांश बंधारे भरण्याच्या मार्गावर आहेत. तालुक्यात आठ दिवसांपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे.

ओढ्यांना आलेल्या पाण्यामुळे रिहे, पिंपळोली, घोटावडे, लव्हार्डे, वांजळे, आंदगाव येथील बंधारे भरले आहेत. तालुक्यातील टेमघर, मुळशी धरणांच्या पाण्याची पातळीत वाढ झाली आहे. पावसाचा जोर कमी असल्यामुळे बंधारे व धरणे भरण्यास उशीर होत आहे.

त्यामुळे मुठा नदीवरील खडकवासला धरणही अद्याप भरले नाही. तालुक्याच्या पश्चिम भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असून पूर्व भागात कमी आहे. पिंपळोली येथील बंधारा भरल्यामुळे खांबोली,

जवळ, सावलेवाडी येथील शेतकऱ्यांच्या शेतीला बारमाही पाण्याचा प्रश्न सुटला आहे, असे येथील शेतकरी नीलेश शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, तालुक्यात सर्व शिवारास पाण्याची सोय झाल्यामुळे भात लावणीची लगबग सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mhada: रहिवाशांना गुडन्यूज! घरं रिकामी करण्यासाठी शिप्टींन चार्जेस देणार, आर्थिक मदतीसाठी म्हाडाचा मोठा निर्णय

EKA Mobility : इलेक्ट्रिक वाहन निर्मिती, स्त्रीसन्मान अन् तरुणांना रोजगार; EKA Mobility चा तिहेरी विजय! वाचा सविस्तर यशोगाथा

T20 World Cup 2026: पाकिस्तानी सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये अव्वल अन् विकेट्स घेणाऱ्यांमध्ये अमेरिकन टॉपर! भारतीय कुठेत?

Money Lending Law: महाराष्ट्रातील सावकार अडचणीत येणार! कायद्यात मोठा बदल होणार; महाराष्ट्र सरकार महत्त्वाचं पाऊल उचलणार

Virar News : भाजपला धक्का! भाजप महिला मोर्चा प्रमुख ॲड. साधना धुरी यांचा बविआत प्रवेश

SCROLL FOR NEXT