पुणे

मुळशी तालुक्यातील उत्पादकांची दूध खरेदी दर वाढविण्याची मागणी

CD

भुकूम, ता. २७ : शासनाने गायीच्या दूध खरेदीस तेहतीस रुपये प्रतिलिटर जाहीर केला होता. त्याची कोणतीच कार्यवाही झाली नाही. हा दर कमी असून, शासनाने चाळीस रुपये दर करावा, अशी मागणी मुळशी तालुक्यातील दूध व्यावसायिकांनी केली आहे.
तालुक्यात गायीच्या दुधाचे उत्पादन प्रतिदिन किमान दहा हजार लिटर आहे. अनेक खासगी व सहकारी व्यावसायिक शेतकऱ्यांकडून अठ्ठावीस रुपये लिटरने दूध खरेदी करतात. तसेच ग्राहकांना साठ रुपये लिटरपर्यंत विकले जाते. यामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागतो. तसेच पशू खाद्य व गाईंचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. तसेच दूध उत्पादनासाठी अतिशय कष्ट असतात. त्यामुळे हा व्यवसाय परवडत नाही असे दूध उत्पादक अमित भोसले, नीलेश शिंदे, योगेश तावरे, कैलास शिंदे यांनी सांगितले. शासनाने गायीच्या दुधास किमान चाळीस रुपये प्रती लिटर दर करावा, अशी दूध उत्पादकांची मागणी आहे.
दरम्यान, तालुक्यातील शेतकरी तरुणांनी गायीचा दूध व्यवसाय करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राकडून प्रकल्प मंजूर केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Fall : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; गुंतवणूकदारांची नफावसुली, खरेदीदारांसाठी चांगली संधी

मोदी सरकारची मोठी घोषणा! पेट्रोल-डिझेलवरील करात कपातीची घोषणा; 1 जूनपासून निर्णय लागू पण खरी गोष्ट वेगळीच

Petrol-Diesel Rate: आज देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात किती वाढ झाली? तुमच्या शहरातील नवीन दर जाणून घ्या...

IPL 2026 Final: IPL 2026 चा 'फायनल' सामना रद्द झाल्यास कोण बनणार विजेता ? RCB की GT, काय आहे नियम

Nagpur Heatwave Deaths : नागपुरात उष्माघाताचा कहर ! एकाच दिवशी तिघांचा मृत्यू, प्रशासन अलर्टवर

SCROLL FOR NEXT