पुणे

प्रसंगावधानाने वृषालीने वाचविला जीव

CD

भुकूम, ता. १९ : भुकूम (ता. मुळशी) येथील सेल पेट्रोल पंपा जवळ रस्त्यावर ऑइल सांडल्यामुळे दुचाकीस्वारांचे अपघात झाले. यामध्ये वृषाली राम गायकवाड ( रा. शिंदेवाडी) दुचाकीसहीत टेम्पो खाली गेली होती. ग्रामस्थांचे सहकार्य, हेल्मेटमुळे ती बचावली आहे.
याबाबत पोलिस म्हणाले, ‘‘भुकूम येथील रस्त्यावर शुक्रवारी सायंकाळी ऑइल सांडले होते. दरम्यान तेथे अपघात होऊ नये म्हणून कोणतीही दक्षता घेण्यात आली नाही. त्यामुळे पाच दुचाकी स्वारांचे गाडी घसरून अपघात झाले. दरम्यान वृषाली सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कामावरून दुचाकीवर घरी चालली होती. ऑइलमुळे तिची दुचाकी घसरली. रस्त्यावरून उठत असताना मागून भरधाव वेगाने टेम्पो पुण्यावरून पिरंगुटकडे जात होता. टेम्पो अंगावरून जाऊन मागील चाकात तिचे डोके अडकले, ती तीनशे फूट फरपटत गेली. टेम्पो चालकास ते कळून आले नाही. रस्त्यावरील ग्रामस्थांनी मोठ्याने ओरडून टेम्पो चालकास थांबवले. वृषालीने प्रसंगावधान राखून टेम्पो मागे पुढे करू नका नाही तर चाक डोक्यावरून जाईल अशी सूचना ग्रामस्थांना केली. ग्रामस्थांनी टेम्पो उचलून तीला चाकांतून बाहेर काढले. तसेच खासगी रूग्णालयात दाखल केले. टेम्पो ड्रायव्हर मयूर राजेश कंधारे (रा. भुकूम) यास पोलिसांनी अटक केली आहे. फिर्याद नितीन जयसिंग गायकवाड यांनी दिली. पुढील तपास बावधन पोलिस चौकीचे पोलिस निरीक्षक अनिल विभूते, नाईक पी. बी. काळे करत आहे.

हेल्मेटमुळे वाचले प्राण
वृषाली टेम्पोच्या चाकात अडकून फरपटत गेली. डोक्यात हेल्मेट असल्यामुळे डोक्यावरून चाक जाऊ शकले नाही. हेल्मेटमुळे डोक्याला इजा झाली नाही. हेल्मेट फुटले तिचे प्राण वाचले. तिला किरकोळ जखम झाली. बाहेर काढल्यावर तिने पहिला वडील राम यांना फोन करून घटनेची माहिती सांगितली. ‘मी सुरक्षित आहे, तुम्ही काळजी करू नका’ असे सांगितले. हेल्मेट नसते तर मी वाचले नसते असे तिने व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG टंचाई टाळण्यासाठी रेल्वेचा मोठा निर्णय! अन्न आता इंडक्शन कुकरवर शिजवणार; स्वयंपाकघरात ‘फ्लेमलेस’ क्रांती

BAN vs PAK : हा, घे बॉल... कर OUT! पाकिस्तानी फलंदाजाचा मुर्खपणा जगाने पाहिला... बाद देताच बांगलादेशच्या खेळाडूला भिडला Video Viral

Uttarakhand Travel Guide: हिमालयात लपलेलं स्वर्गासारखं ठिकाण! चोपटा व्हॅलीला का म्हणतात ‘मिनी स्वित्झर्लंड’?

T20 World Cup गाजवणाऱ्या गोलंदाजाचा पाकिस्तानला ठेंगा! IPL 2026 मध्ये KKR कडून खेळण्यासाठी तयार

Navi Mumbai: ऐरोलीत भीषण अपघात! जेसीबी आणि दुचाकीची जोरदार धडक, दोन तरुणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT