भुकूम, ता. २७ : संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्यावतीने दिवाळीनिमित्त सभासदांसाठी साखर वाटप कार्यक्रम जाहीर केला आहे. साखर प्रतिकिलो २० रुपये दराने देण्यात येणार आहे.
साखरेचे वाटप शुक्रवार, तीन ऑक्टोबर ते १७ आक्टोबर कालावधीत प्रत्येक गटात दिलेल्या तारखांना होईल, असे कारखान्याचे कार्यकारी संचालक एस. जी. पठारे व व्यवस्थापकीय अधिकारी मोहन काळोखे यांनी कळविले आहे.
साखर वाटप कार्यक्रम : गाव (कंसात दिनांक) : भोसे - (३) मरकळ (३, ४), शेलपिंपळगाव (बहुल शाळेजवळ) (४), दोंदे (भोसे ऑफीस ) व कोरेगाव भीमा - (६), चाकण मार्केटयार्ड व पिंपळे जगताप चौफुला (७), देहूगाव, संत तुकाराम गाथा मंदिराजवळ (८), इंदोरी कार्यालय (८,९), संकल्प मंगल कार्यालय चऱ्होली (९), जय सुचंद्रिका कार्यालय घोटावडे व पैसा फंड प्राथमिक शाळा तळेगाव (१०,११), पौड एसटी स्टँडजवळ व येळसे ग्रामपंचायत कार्यालय (१३,१४), मुठा जिल्हा बँकेजवळ व शिवशंकर मंगल कार्यालय कामशेत (१५,१६), कोळवण, धायरी, श्रीरंग चव्हाण ऑफिस-संचेती लॉन्स लोणावळा (७), तसेच कारखाना स्थळ (१५, १८, २७, ३१),
दरम्यान, स्मार्ट कार्ड हरवले असेल तर मूळ सभासदांचे आधारकार्ड, पॅनकार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स दाखवून के.वाय.सी. करून घ्यावी, असे आवहान कारखान्याच्यावतीने केले आहे.