पुणे

घोटावडे ते पुणे स्टेशन बससेवा सुरू

CD

भुकूम, ता. १० ः घोटावडे (ता. मुळशी) येथील ग्रामस्थांसाठी पुणे स्टेशनपासून पीएमपील बससेवा सुरू करण्यात आली. दिवसातून चार वेळा बस सेवा राहणार असून, त्यामुळे ग्रामस्थांची चांगली सोय होणार आहे.
येथील बस सेवेचे उद्‍घाटन जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे यांच्या हस्ते करण्यात आले. बस सुटण्याच्या वेळा स्टेशन येथून सकाळी ६.३० व ९.३० वा. सायंकाळी ४.१५ व रात्री ८.१५ वाजता राहील. घोटावडे येथून सकाळी ७.४५ व ११.४५ वाजता व सायंकाळी ६ व रात्री १० वाजता सुटण्याच्या वेळा राहतील.
पुणे स्टेशन ते पुणे विद्यापीठ, पाषाण, सूस, नांदे, चांदे, मुलखेड ते घोटावडे असा बसचा मार्ग राहणार असल्याचे उपसरपंच भीमाजी केसवड यांनी सांगितले. यावेळी शांताराम इंगवले, रवींद्र कंधारे, तात्यासाहेब देवकर, कैलास मांडेकर, संतोष गोडांबे, संदीप खानेकर, बाजीराव धुमाळ, यशवंत देवकर, सरपंच मंगल गोडांबे, सदस्य राजाभाऊ शेळके, हनुमंत घोगरे, संतोष गोडांबे, स्वाती भेगडे, सारिका खानेकर, सोनाली मातेरे आदी उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी चालक व वाहक यांचा सन्मान केला.

02763

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT