भिगवण, ता. ९ : मदनवाडी (ता.इंदापूर) येथील विरवाडी नं.२ भागातील जावलसिध्दनाथ मंदिरमधून अज्ञात चोरट्याने नवस फेडायची खोटावणी बतावणी करून मंदिरात प्रवेश करून देवाच्या अंगावरील ७० हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. याबाबत अभिमन्यू पर्वती बंडगर (वय ५१, धंदा शेती रा. विरवाडी नं 2 मदनवाडी ता. इंदापूर, जि. पुणे) यांनी भिगवण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
भिगवण पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मदनवाडी (ता.इंदापूर) येथील विरवाडी नं.२ भागातील जावलसिध्दनाथ मंदिरामध्ये एक अंदाजे ५५ वर्षाचा व अंगात लाल शर्ट व काळया रंगाची पॅन्ट घातलेला अज्ञात आला. या व्यक्तीने ‘मला देवाला नवस बोलायचा आहे, मला चावी दया,’ असे म्हणून फिर्यादी अभिमन्यू बंडगर यांच्या आईचा विश्वास संपादन करून मंदिराची चावी फिर्यादीचे आईकडून घेऊन श्री. जावलसिध्दनाथ मंदिरातील देवाच्या अंगावरील वरील २० हजार रुपये किमतीची चांदीची छत्री, पाच हजार रुपये किमतीची चांदीची चिलीम, पाच हजार रुपये किमतीची देवाच्या गळ्यातील चांदीची चैन, ३० हजार रुपये किमतीचे मनी व डोरले, दहा हजार रुपये रोख रक्कम, असा एकूण ७० हजार रुपये किमतीचा ऐवज विश्वासघात करून घेऊन गेला आहे. याबाबत अज्ञात इसमाविरुद्ध भिगवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.