भिगवण, ता. १८ : येथील थोरातनगर परिसरात गुरुवार (ता. १६) ते शुक्रवारदरम्यान (ता. १७) बंद असलेल्या सदनिका फोडून चोरट्यांनी सुमारे ८ लाख ६३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
याबाबत भिगवण पोलिसांनी माहिती दिली की, येथील थोरात नगरमध्ये कृष्णा नारायण शेंडगे यांची सदनिका आहे. सदनिका बंद असल्याचा गैरफायदा घेत चोरट्याने बंद सदनिकेच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून घरातील सोने व रोख रक्कम मिळून ३ लाख ६९ हजार रुपयांची चोरी केली. दुसऱ्या चोरीच्या घटनेमध्ये थोरातनगर येथील निलम प्रकाश देवकाते यांचे बंद सदनिकेचे कुलूप तोडून घरातील सोन्याचे दागिणे व रोख रक्कम मिळून ३ लाख ८७ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. तर, आणखी एका चोरीच्या घटनेमध्ये थोरात नगर येथील अन्नपूर्णा अपार्टमेंट येथे राहत असलेल्या संपत रोहिदास शेटे यांची पार्किंगमध्ये असलेली अंदाजे ८० हजार रुपये किमतीची बजाज पल्सर दुचाकी (क्र. एम.एच. १६ डी.एल. ७२८६) चोरुन नेली. २४ तासांमध्ये तीन ठिकाणी चोरी झाल्यामुळे नागरिकांमध्ये चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे. याप्रकरणी येथील भिगवण पोलिस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास येथील भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद महांगडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमित पाटील करीत आहेत.
दरम्यान, भिगवण पोलिस ठाण्याच्या शेजारीच एकाच रात्री तीन जबरी चोऱ्या झाल्यामुळे येथील लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील पोलिस ठाण्याच्या वतीने रात्र गस्त सुरु करण्याची मागणी भिगवण व परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.