पुणे

भिगवण बसस्थानकाला तळ्याचे स्वरूप

CD

भिगवण, ता. २५ : इंदापूर तालुक्यातील भिगवण, तक्रारवाडी, मदनवाडी, डिकसळ, पोंधवडी गावांमध्ये मागील पंचवीस वर्षातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. शनिवारी व रविवारी सलग दोन दिवस झालेल्या झालेल्या पावसामुळे येथील बस स्थानकाला तळ्याचे, तर राष्ट्रीय महामार्गाचा सेवा रस्ता व गावातील रस्त्याला नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.
भिगवण परिसरात २१ मेपासून सतत सुरु असलेल्या पावसाने शनिवारी (ता. २४) व रविवारी (ता. २५) कहर माजविला. रविवारी येथील आठवडे बाजार असतो, परंतु सकाळीच सुरु झालेल्या पावसामुळे त्यावर परिणाम झाला. रविवारी सकाळी नऊच्या सुमारास सुरु झालेल्या पाऊस सुमारे चार तासांहून अधिक काळ सुरु होता. संततधार पावसामुळे भिगवण गावाच्या पश्चिमेकडे असलेल्या डोंगरावरून पाणी वाहत होते. पश्चिम भागातील पाणी राष्ट्रीय महामार्गाच्या सेवा रस्त्यावर आल्यामुळे सेवा रस्त्याला नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले. त्यानंतर हे पाणी येथील बस स्थानकांमध्ये घुसले. त्यामुळे बस स्थानकाचे तळ्यात रूपांतर झाले होते. बस स्थानकातील पाणी ग्रामीण रुग्णालय, थोरात नगर परिसरात घुसल्यामुळे नागरिकांची धावपळ झाली.
या पावसामुळे स्वामी चिंचोली, भिगवण, मदनवाडी येथील ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले. तक्रारवाडी येथील उजनी धरणातील बुडीत बंधाऱ्यातही मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते.
या भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रामुख्याने केळी, आंबा आदी फळबागांचे, तसेच कांदा, फळभाज्या उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. लहान ऊस असलेल्या शेतामध्ये पाणी साचल्यामुळे त्याचा वाढीवरही विपरीत परिणाम होणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण आहे.

२५ वर्षांतील सर्वाधिक पाऊस
भिगवण व परिसरामध्ये २० मे ते २५ या कालावधीमध्ये २५२ मि.मी. तर मागील चोवीस तासांत १६६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. चोवीस तासांमध्ये, तसेच पूर्व मोसमी पावसामध्ये मागील पंचवीस वर्षातील हा सर्वाधिक पाऊस असल्याचे येथील महाबॅंक ग्रामीण विकास केंद्रामधील नोंदीवरून दिसून येत आहे. सरासरी पावसाच्या पन्नास टक्के पाऊस पाचच दिवसांमध्ये झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: देशात पहिल्यांदाच महाराष्ट्रात जमिनीसारखाच पाण्याचाही सातबारा; महसूल विभागाचा निर्णय

Nagpur: वैद्यकीय पदवी घेणारी पत्नी मानसिक अस्थिर कशी; आयपीएस अधिकाऱ्याची याचिका फेटाळली

Nagpur: नवतपाच्या पहिल्याच दिवशी चटके; ब्रह्मपुरीचा पारा ४७.६ तर, नागपूर ४६.५ अंशांवर

Rwanda Economy: रवांडा : आफ्रिकेतील उदयोन्मुख अर्थव्यवस्था

Satej Patil Hasan Mushrif : गोकुळ दूध संघात सतेज पाटील, मंत्री मुश्रीफांचे एकत्र पॅनेल? उघडउघड विरोध की अंतर्गत मैत्री जपणार

SCROLL FOR NEXT