पुणे

मलमपट्टी नको कायमस्वरूपी तोडगा काढा

CD

भिगवण, ता. २७ : दरवर्षी पावसाळा आला की तुंबलेल्या गटारांची तात्पुरती दुरुस्ती असे चित्र मागील बारा वर्षापासून भिगवणकर पाहत आले आहेत. गटारे तुंबण्याच्या समस्येवर आत्ता केवळ मलमपट्टी नको तर या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी भिगवणकरांकडून करण्यात येत आहे.

भिगवणच्या पश्चिम भागातून येणाऱ्या पावसाच्या पाण्यास योग्य दिशा दिल्यामुळे सर्व पाणी सेवा रस्त्यावर भिगवण बस स्थानक व तेथून थेट थोरात नगरमधील घरांमध्ये शिरल्यामुळे येथील घरांचे मोठे नुकसान झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार व क्रीडामंत्री दत्तात्रेय भरणे यांनी सूचना केल्यानंतर सोमवारपासून (ता.२६) तुंबलेली गटारे स्वच्छ करण्याचे काम सुरू केले आहे. परंतु केवळ तुंबलेली गटारे मोकळी करण्यापेक्षा गटारांमध्ये पाणी योग्य पद्धतीने सामावून घेण्यासाठी व राष्ट्रीय महामार्गाच्या पश्चिम भागातील पाण्याला योग्य दिशा देण्याची आवश्यकता आहे.

राष्टीय महामार्गाच्या सेवा रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटारे असूनही ती सातत्याने तुंबलेली असल्यामुळे गटारांच्या बाजूने सेवा रस्त्यावरून वाहणारे घाण पाणी, रस्त्याच्या दोन्ही सेवा रस्त्याच्या बाजूला असलेले कचऱ्याचे ढीग, असे चित्र येथे दिसत आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या संपूर्ण दोन किलोमीटर परिसरामध्ये कोठेही स्वच्छता गृह नसल्यामुळे या भागांमध्ये घाणीचे साम्राज्य दिसून येते तर भिगवण व मदनवाडी येथील उड्डाण पुलाच्या खाली परिसराची योग्य निगा राखली जात नसल्यामुळे सदर परिसराचा उपयोग नागरिकांकडून स्वच्छतागृहासारख्या करण्यात येत असल्यामुळे सदर परिसरामध्ये दुर्गंधी पसरली आहे.

सध्या राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाकडून तात्पुरती मलमपट्टी करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे हा प्रश्न सुटणार नाही. राष्ट्रीय महामार्गाच्या पश्चिम बाजूकडील पाण्याचे योग्य व्यवस्थापन तसेच गटारांना योग्य उतार देण्याची आवश्यकता आहे त्याशिवाय हा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार नाही.
- रामचंद्र कदम, नागरिक

01128

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil Criticism Pune Bridge Project : पुण्यातलं आठवं आश्चर्य! या ब्रिजवर चढू शकता पण उतरू शकत नाही, कंत्राट द्यायच्या घाई गडबडीत चूक; जयंत पाटलांचा टोला

T20 WC, NZ vs SA: 'गालावर थोबाडीत मारली असं... ', न्यूझीलंडविरुद्धच्या लाजीरवाण्या पराभवानंतर एडेन मार्करम काय म्हणाला?

Latest Marathi News Live Update : शेअर मार्केटच्या आमिषाने ज्योतिषाकडून कोट्यवधींची फसवणूक, सायबर पोलिसांची लूक आऊट नोटीस

बापरे! वर्षा उसगांवकरांची लाखो रुपयांची फसवणूक, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, नक्की काय घडलं?

Pune Crime News : पुण्यात लेकीची छेड काढणाऱ्या हुल्लडबाज विद्यार्थ्याला वडिलांची कॉलेजमध्ये घुसून बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT