पुणे

मदनवाडीत दुकान फोडून अडीच लाखांची चोरी

CD

भिगवण, ता. ३१ : मदनवाडी (ता. इंदापूर) येथील मोटार रिवायडिंगचे दुकान फोडून सुमारे अडीच लाख रुपयांची मोटार रिवायडिंगची वायर, पितळी बुशिंग व स्क्रॅप चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना शुक्रवारी (ता. ३०) रात्री घडली.
याबाबत यांनी भिगवण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत भिगवण पोलिसांनी माहिती दिली की, तक्रारवाडी येथील महेंद्र मोहन भोंडवे (वय ३१ रा. तक्रारवाडी) यांचे मदनवाडी येथे रोहन ट्रेडर्स नावाचे मोटार रिवायडिंगचे दुकान आहे. शुक्रवारी (ता. ३०) रात्री दुकान बंद असताना सदर दुकानाच्या बंद शटरची कडी तोडून दुकानातील १ लाख ७८ हजार रुपये किमतीची मोटार रिवायडींडिंगची कॉपर वायर, ४५ हजार रुपये किमतीचे पितळी बुशिंग, तसेच १५ हजार रुपये किमतीचे स्क्रॅप अज्ञात चोरट्याने चोरून नेले. या प्रकरणी अज्ञात चोरट्य़ांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास येथील भिगवण पोलिस ठाण्याचे साहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद महांगडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार उगले करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka Politics: डीके शिवकुमार CM बनण्याआधीच कर्नाटकमध्ये प्रेशर पॉलिटिक्स! दलित-लिंगायत समाजाकडून मोठी मागणी, काँग्रेससमोर नवी डोकेदुखी

Mahur Renuka Devi Temple: माहूर गडावरील श्री रेणुका देवीला आंब्याची आरास; अधिक महिन्यात भाविकांची मोठी गर्दी

Baramati Sugarcane Farming: पणदरेत ‘ऊस शेतीची नवी दिशा’ परिसंवादाला उत्स्फूर्त प्रतिसाद; एकरी १०० टन ऊस उत्पादनासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शक दिशा

Chakan Onion Price Row: कांदा दरप्रश्नी चाकण बैठक की राजकीय आखाडा? शेतकरी संघटनेच्या नेत्यांत वाद

Pune Toxic Liquor: पुणे-पिंपरीतील विषारी दारूकांडाचा उगम उरुळीकांचन? स्थानिक तरुणाचा मृत्यू, भेसळ रॅकेटवर संशय तीव्र

SCROLL FOR NEXT