भिगवण, ता. २ : मदनवाडी (ता. इंदापूर) येथील विमा व्यावसायिक तुषार शशिकांत धुमाळ यांच्या अकलुज (जि. सोलापूर) येथील सयाजीराजे पार्कमधील पाळणा तुटुन झालेल्या दुर्घटनेतील मृत्यू प्रकरणी आरोपींविरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, तसेच दोषींना तातडीने अटक करावी, अशी मागणी धुमाळ कुटुंबियांनी केली आहे. राजकिय दबावामुळे सदर प्रकरणाचा तपास योग्य दिशेने होत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणाचा तपास योग्य रितीने करा, अन्यथा कुटुंबासह सोलापुर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्राणांतिक उपोषण करू, असा इशारा त्यांनी सोलापुर जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक, मुख्यंमत्री, उपमुख्यमंत्री यांना निवेदनद्वारे दिला आहे.
याबाबत विशाल धुमाळ व अक्षय धुमाळ यांनी दिलेल्या निवेदनानुसार, सयाजीराजे पार्कमध्ये गंभीर जखमी झालेल्या तुषार यांना तातडीने वैद्यकिय उपचाराचा गरज असताना पार्क व्यवस्थापनाने हलगर्जीपणा केला, पार्कमध्ये सुरक्षेसाठी उपाययोजना नाही, विविध उपकरणांच्या देखभाल दुरुस्तीचा अभाव, रुग्नवाहिकेचा अभाव आहे. या प्रकरणी अकलुज येथील पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे, परंतु राजकिय दबावापोटी तपास योग्य दिशेने होत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.