भिगवण, ता. १९ : येथील महिलांना ५० टक्के सवलतीच्या दरात माजी सरपंच दीपिका क्षीरसागर यांच्या सहकार्यातून विविध वस्तूंचे वितरण करण्यात आले. यावेळी महिलांना आत्मनिर्भर होण्यासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे महिलांच्या वतीने स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी इंदापूर अर्बन बॅंकेचे माजी अध्यक्ष अशोक शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, भिगवण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजित क्षीरसागर, माजी सरपंच दीपिका क्षीरसागर, सीमा काळंगे, रमेश धवडे, दादासाहेब थोरात, रियाज शेख, अजिंक्य माडगे, तुकाराम बंडगर, यशवंत वाघ, संदीप वाकसे, नानासाहेब बंडगर, निखिल बोगावत, आकाश पवार उपस्थित होते. यावेळी महिलांना ५० टक्के सवलतीने शिलाई मशिन, पिठाची गिरणी, शेती पंप आदी साहित्यांचे वितरण केले. माजी सरपंच दीपिका क्षीरसागर म्हणाल्या की, महिलांना गृह उद्योगाच्या माध्यमातून आत्मनिर्भर करणे हा या योजनेमागचा प्रमुख उद्देश आहे. या योजनेमधून ५० टक्के सवलतीने देण्यात आलेल्या साहित्यांमधून महिला गृह उद्योग सुरू करू शकतील व त्यामधून आर्थिक आत्मनिर्भरता प्राप्त होईल. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. तुषार क्षीरसागर व अप्पासाहेब गायकवाड यांनी केले.