पुणे

ध्येय निश्चित करून प्रामाणिक प्रयत्न केल्यास यश निश्चित : शिंदे

CD

भिगवण, ता. १ : ‘‘उच्च शिक्षणामध्ये ग्रामीण भागातील मुला- मुलींचे प्रमाण वाढत आहे, ही समाधानाची बाब आहे. ग्रामीण भागातील मुलांमध्ये कष्ट करण्याची प्रचंड क्षमता असते. उच्च शिक्षणाच्या विविध अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या ग्रामीण भागातील मुला-मुलींनी ध्येय निश्चित करून प्रामाणिक प्रयत्न केल्यास यशाचा मार्ग निश्चित सुकर होईल,’’ असा आशावाद प्रमुख वक्ते गणेश शिंदे यांनी व्यक्त केला.
स्वामी चिंचोली (ता. दौंड) येथील दत्तकला शिक्षण संस्थेमधील विविध अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभामध्ये शिंदे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ होते. यावेळी संस्थेच्या सचिव माया झोळ, संचालक प्रा. श्रीकांत साळुंके, प्राचार्य डॉ. एस. ए. पाटील, डॉ. विशाल बाबर आदी उपस्थित होते.
अध्यक्ष प्रा. झोळ म्हणाले की, ‘‘दत्तकला शिक्षण संस्था ही नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक प्रगतीसाठी प्रयत्नशील राहिली आहे. उत्कृष्ट शिक्षक, अत्याधुनिक प्रयोगशाळा व संशोधनाची नानाविध संधी संस्थेने उपलब्ध करून दिल्या आहेत.’’
यावेळी दत्तकला शिक्षण संस्थेच्या दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स या महावि‌द्यालयातील पदवी अभियांत्रिकी, पदविका अभियांत्रिकी, एम.बी.ए., एम.सी.ए. या अभ्यासक्रमासाठी प्रथम वर्षामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे वरिष्ठ वर्गातील विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.
यावेळी माया झोळ यांनी मनोगत व्यक्त केले. शिवानी बिडवे व सृष्टी अहिरे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. डॉ. नरेश घोरपडे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur News : बाळूमामा ट्रस्ट जमीन खरेदीत मनमानी,खडकेंचे एजंटांच्या मदतीने व्यवहार , वरिष्ठही अंधारात

Job Fraud Case: नोकरीच्या आमिषाने १.१० कोटीची फसवणूक

IND A vs PAK A: "साथ दिली असती, तर मी सामना संपवला असता..." तिलक वर्माने पाकविरुद्ध हरल्यानंतर सांगितलं कुठे फसला डाव

Car Accident: भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; चालक पसार

Solapur Airport: बोरामणी विमानतळाच्या १७०० एकरावर होणार एमआयडीसी! 'फॉरेस्ट'ची ३३.७२ एकर जमीन धावपट्टीवर; 'माळढोक'चा अडथळा, जिल्हाधिकारी म्हणाले...

SCROLL FOR NEXT