पुणे

ट्रॅक्टरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

CD

भिगवण, ता. २३ : भिगवण बारामती रस्त्यावर पिंपळे (ता. इंदापूर) येथे ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिली. यामुळे झालेल्या अपघातात हरिदास अण्णा धोत्रे (वय. २८ रा. मदनवाडी, ता. इंदापूर) या सायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. बेशिस्त ऊस वाहतुकीचा हंगामातील हा दुसरा बळी ठरला आहे. ऊस वाहतुकीवर पोलिस प्रशासन व परिवहन विभाग यांनी तातडीने योग्य उपाय योजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. अपघाताबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिदास धोत्रे हा रविवारी (ता.२३) पहाटे दीडच्या सुमारास मोटार सायकलवरून भिगवणहून बारामतीकडे निघाला होता. त्यावेळी पिंपळे येथे ट्रॅक्टर तरुणाचा जागीच मृत्यू झाला तसेच मोटार सायकलीचे मोठे नुकसान झाले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद महांगडे यांनी सांगितले. अधिक तपास भिगवण पोलिस करीत आहेत.

01298

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : शनिवारवाडा पुन्हा सात मजली करा; आमदार हेमंत रासने यांची मागणी

Mumbai Local: महिला प्रवाशांसाठी मोठी बातमी! मुंबई लोकलमध्ये ‘पिंक कोच’ सुरू होणार; सुरक्षित प्रवासासाठी नवा उपक्रम

Beed Crime: परळीत अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार; दोन नराधमांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

Gas Cylinder Issue : ना आंघोळ, ना जेवण, गॅस साठी वणवण; गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांनी गाठले पोलीस ठाणे

Latest Marathi News Live Update : कुस्ती महासंघाच्या विरोधात ISWAI ची पुणे कोर्टात धाव

SCROLL FOR NEXT