पुणे

क्षीरसागर विद्यालयातील परीक्षा केंद्र पूर्ववत सुरू

CD

भिगवण, ता. १६ ः येथील कोंडीराम सदाशिव क्षीरसागर कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे इयत्ता बारावीचे परीक्षा केंद्र पूर्ववत सुरू ठेवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. उच्च न्यायालयाने केंद्र पुर्ववत करण्याचे आदेश दिल्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, फेब्रुवारी २०२५च्या इयत्ता बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेवेळी येथील परीक्षा केंद्रावर एका विद्यार्थिनीने गैरप्रकार केल्याची बाब भरारी पथकाच्या निदर्शनास आली होती. सदर विद्यार्थिनीवर गैरप्रकार केल्याची तक्रार दाखल करुन बोर्डाने विद्यालयाचे परिक्षा केंद्र रद्द केले होते. याबाबत संस्थेच्या वतीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तत्सम प्रकार आणखी काही केंद्रावर घडले असतानाही केवळ एका विद्यार्थिनीने गैरप्रकार केल्यामुळे परिक्षा केंद्र रद्द करणे योग्य नसल्याची बाब संस्थेच्या वतीने उच्च न्यायालयात मांडण्यात आली होती. संस्थेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या युक्तिवादानंतर न्यायालयाने कोडींराम सदाशिव क्षीरसागर कनिष्ठ महाविद्यालयातील बोर्ड परीक्षा केंद्र शैक्षणिक वर्षे २०२६-२७ पासून पुर्ववत सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहे. संस्थेच्या वतीने ॲड. लक्ष्मण देशमुख यांनी युक्तिवाद केला.
याबाबत संस्थेचे अध्यक्ष अजित क्षीरसागर म्हणाले, ‘‘ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परिसरातच परीक्षा देण्याची सोय व्हावी यासाठी संस्थेने परीक्षा केंद्र सुरू केले होते. किरकोळ गैरप्रकारानंतर केंद्र रद्द करण्यात आले होते. याबाबत संस्थेने उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर. उच्च न्यायालयाने संस्थेची बाजू मान्य करत शैक्षणिक वर्षे २०२६-२७ पासून परीक्षा केंद्र पूर्ववत करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sidharth Malhotra's Father Passes Away : सिद्धार्थ मल्होत्राच्या वडिलांचे निधन!, भावूक होत केली पोस्ट अन् म्हणाला...

Bhigwan Crime : आई अन् भावाच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून तरुणीचे दोघांकडून अपहरण

Car Accident : भरधाव मोटारीच्या धडकेत बालकाचा मृत्यू; तिघे जण गंभीर जखमी

Pune Traffic: गुरुवारी पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद? कोणते रस्ते सुरु? वाचा सविस्तर

पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी एका पदासाठी १० उमेदवार! सोलापूर शहर-ग्रामीण पोलिसांच्या १६९ पदांसाठी ३१६६ जण ‘मैदानी’त पास, वाचा...

SCROLL FOR NEXT