भिगवण, ता. २२ : येथील कथित अपहरण घटनेचा तपास निःपक्ष व कोणताही राजकीय दबाव न घेता करावा, तसेच मुलीला तिच्या कुटुंबाच्या ताब्यात देण्याची मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने भिगवण पोलिसांकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली. या वेळी घनश्याम हाके, आबासाहेब देवकाते, प्रदीप वाकसे आदींसह ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी हाके म्हणाले, ‘‘या प्रकरणाला वेगळे वळण देण्यात आले असून, दबावात व्हिडिओ बनविले जात आहेत. यामागे मोठी राजकीय ताकद असल्यानेच आरोपींची एवढी मजल वाढली. या घटनेचा तपास निष्पक्ष पद्धतीने व तातडीने करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.’’