पुणे

मदनवाडीत डिजिटल अभ्यासिकेची मागणी

CD

भिगवण, ता. २३ : मदनवाडी (ता. इंदापूर) गावातील अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत, परंतु सुविधांच्या अभावामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करत असताना अडचणी येत आहेत. विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन गावासाठी अद्ययावत संदर्भ ग्रंथ आणि पोषक फर्निचर असलेली ‘डिजिटल अभ्यासिका’ उभारण्यासाठी निधी मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार नुकतेच कामानिमित्त भिगवण येथे आले होते. त्यावेळी इंदापूर तालुका भाजपचे अध्यक्ष तेजस देवकाते यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री शेलार यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी केली. देवकाते यांनी दिलेल्या निवेदनानुसार मदनवाडी गावातील अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत, परंतु सुविधांच्या अभावामुळे विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत, तसेच गावांमध्ये भजन व कीर्तनाचीही परंपरा आहे त्यासाठी सांस्कृतिक सभागृहाची आवश्यकता आहे. ‘‘विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका व सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी सांस्कृतिक सभागृह मंजूर करावे,’’ अशी मागणी देवकाते यांनी केली आहे. याबाबत सांस्कृतिक कार्यमंत्री शेलार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : अशोक खरातला भेटलेल्यांची HIV टेस्ट करा, नाहीतर...; विजय वडेट्टीवारांचा इशारा

Dhurandhar 2: ‘धुरंधर 2’मध्ये जसकीरतच्या बहिणीची चर्चा! तिच्या सौंदर्य पाहून अलिनाही वाटेल फिकी

Jalgaon Cotton Production : जळगावचा कापूस हंगाम संपुष्टात! 'सीसीआय'ची खरेदी बंद, निम्म्यावरच अडकले कापूस गाठींचे उत्पादन

Manchar Accident : मंचरजवळ एकलहरे येथे भीषण अपघात! पिंपरी-चिंचवडचे वास्तुविशारद आंबेगावे पती-पत्नी व सासूचा मृत्यू, दोन मुले गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : PMNRF मधून प्रत्येक मृताच्या निकटच्या नातेवाईकांना २ लाख रुपयांची सानुग्रह मदत दिली जाईल

SCROLL FOR NEXT