पुणे

दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स महाविद्यालयास 2(F) दर्जा प्राप्त

CD

भिगवण, ता. २५ : स्वामी चिंचोली (ता. दौंड) येथील दत्तकला शिक्षण संस्थेच्या दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स महाविद्यालयास विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (U.G.C) 2(F) दर्जा प्राप्त झाला आहे. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोग व शासनाच्या विविध योजना मिळण्यास महाविद्यालय पात्र ठरणार आहे.
दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स महाविद्यालयामध्ये अभियांत्रिकी व व्यवस्थापन शास्त्र विभागातील विविध अभ्यासक्रम राबविण्यात येतात. विविध अभ्यासक्रमाचे या महाविद्यालयामध्ये सुमारे पाच हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महाविद्यालयाचे नुकतेच नॅक मूल्यांकनही झाले आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार महाविद्यालयामध्ये नवीन अभ्यासक्रम राबविणे, स्वायत्तता प्राप्त करणे, शासनाच्या विविध अभ्यासक्रमांठी अनुदान प्राप्त करणे आदींसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाचा 2(F) दर्जा आवश्यक असतो. संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ, सचिव माया झोळ, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. विशाल बाबर, प्राचार्य डॉ. एस ए. पाटील, तसेच संचालक डॉ. श्रीकांत साळुंके व कर्मचारी यांच्या माध्यमातून संस्थेने विद्यापीठ अनुदान आयोगाकडे 2(F) दर्जा प्राप्त करण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता. त्याची छाननी विद्यापीठ अनुदान आयोगाने दर्जा प्रदान केला.
याबाबत प्रा. रामदास झोळ म्हणाले, ‘‘दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स महावि‌द्यालयाने शैक्षणिक क्षेत्रामध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून महाविद्यालयास 2(F) दर्जा मिळणे, ही त्याची पोहोच पावती आहे. यामुळे भविष्यात महाविद्यालय नवीन शैक्षणिक धोरणानुसार विविध अभ्यासक्रम राबविण्यास तसेच शासनाच्या विविध अनुदानाचा लाभ घेण्यास पात्र ठरणार आहे. यासाठी महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Metro 5 : कल्याण ते उल्हासनगरपर्यंत मेट्रो धावणार, १८ हजार कोटींच्या निधीला मंजूरी; कसा असेल मार्ग?

फोनवर बोलेना, इग्नोर करतो! तरुणीनं तरुणाचे आक्षेपार्ह फोटो केले व्हायरल, फेक अकाउंटवरून पाठवले नातेवाईकांना

ठाकरेंची भेट, धीरेंद्र शास्त्रींचं वादग्रस्त विधान ते आमदार गायकवाड; फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया

Dalit Groom Assault : घोड्यावर बसल्यामुळे दिव्यांग दलित नवरदेवाला खाली ओढत बेदम मारहाण; वरातीत घुसून तुफान हाणामारी, नेमकं काय घडलं?

Konkan Railway : उन्हाळी हंगामातील प्रवाशांसाठी ‘कोकण रेल्वे’ने काढला नवा उपाय, चिपळूण-दिवा विशेष मेमू धावणार; असे असेल वेळापत्रक

SCROLL FOR NEXT