पुणे

भोर शहरातील बेशिस्तीला आळा घालणार ः थोपटे

CD

भोर, ता. ३० ः शहरातील वाहनचालकांच्या आणि अतिक्रमण करणाऱ्यांच्या बेशिस्तीला आळा घालण्यासाठी उपाययोजना करणार असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम थोपटे यांनी केले. नगरपालिकेच्या वतीने शहरातील ८ कोटी रुपयांच्या आठ विकासकामांचे भूमिपूजन केल्यानंतर घेण्यात आलेल्या कॉंग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते.
येथील सह्याद्री मंगल कार्यालयात झालेल्या मेळाव्यास कॉंग्रेसच्या महिलाध्यक्षा गीतांजली शेटे, कॉंग्रेसचे गटनेते सचिन हर्णसकर, उपनगराध्यक्ष समीर सागळे, नगरसेवक गणेश पवार, देविदास गायकवाड, चंद्रकांत मळेकर, सुमंत शेटे, अमित सागळे, नगरसेविका तृप्ती किरवे, वृषाली घोरपडे, सोनम मोहिते, अमृता बहिरट, स्नेहा पवार, आशा रोमण, नंदाताई जाधव, बंडूशेठ गुजराथी, अतुल किंद्रे, अतुल शेडगे, विजय शिरवले, प्रवीण शिंदे, राजकुमार शिंदे, डॉ. अण्णासाहेब बिराजदार आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
आमदार संग्राम थोपटे यांनी नगरपालिकेतील सत्ताधारी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने शहरात केलेल्या विकासकामांची माहिती दिली. पुढील काही महिन्यात भोरवासीयांना स्वच्छ व शुद्धीकरण केलेले पाणी वेळेवर मिळणार असून त्यासाठी नवीन २० लाख लिटर क्षमतेच्या नवीन पाण्याच्या टाकीचे काम सुरु असल्याचे सांगितले. शहरातील वाहतूक, अतिक्रमणे, पार्किंग या गोष्टींना आळा घालण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत. राजन घोडेस्वार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
शहरातील एखाद्या ठिकाणचे गटर तुंबले तरी नागरिक संबंधित नगरसेवकांना फोन न करता डायरेक्ट आमदारांना फोन करतात. यामुळे संबंधित नगरसेवकाचे आपल्या प्रभागात लक्ष कमी आहे, असे सांगत आमदार थोपटे यांनी सर्व नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील नागरिकांच्या अडचणींकडे लक्ष द्यावे, अशी सूचना केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT