पुणे

वाढाणे येथे एसटी बस खचली

CD

भोर, ता. ६ : भाटघर धरण परिसरातील वाढाणे (ता.भोर) येथे एसटी बस गटारा शेजारील खड्ड्यात खचल्याने अपघात झाला. यामुळे तीन-चार प्रवासी जखमी झाले. हा अपघात बुधवारी (ता.६) दुपारी तीनच्या सुमारास झाला. भोर आगारातून भोर-मळे एसटी मार्गस्थ झाली. या बसमध्ये वाहनचालक सिध्दार्थ अडसूळ आणि वाहक अश्विनी जाधव यांच्यासह सुमारे ४४ प्रवासी होते. दरम्यान, दुपारी तीनच्या सुमारास वाढाणे येथील वळणावर एसटी गटाराच्या बाजूला असलेल्या खड्यात घसरली आणि तिरक्या पद्धतीने डाव्या बाजूला खचली. त्यामुळे दरवाजा बंद झाला. परंतु चालक व प्रवासी यांनी चालकाचा आणि संकटकालीन दरवाजा उघडून सर्वांना बाहेर काढले. फक्त तीन-चार प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच आगार व्यवस्थापक प्रवीण बांद्रे यांनी तातडीने दुसरी बस पाठवून प्रवाशांना इच्छित स्थळी सोडण्याची व्यवस्था केली. दरम्यान, सायंकाळी उशिरापर्यंत अपघातग्रस्त एसटी बाहेर काढण्याचे काम सुरू होते.
.................
01924

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alcohol Limit Act: पार्टीत अडचण नको! घरी किती मद्य ठेवणे कायदेशीर आहे? नववर्षाच्या सेलिब्रेशनपूर्वी नियम जाणून घ्या

Municipal Council Election: गड राखला; पण नगराध्यक्ष गमावला! भाजपला उरण नगर परिषदेतील सत्ता राखण्यात यश

सचिन पिळगांवकरांना सुद्धा लागलं FA9LA गाण्याचं वेड, सुप्रियासोबत केला भन्नाट डान्स, viral video

Latest Marathi News Live Update : जालन्यात पैशाच्या वादातून तरुणाची गोळी झाडून हत्या

Ichalkaranji Muncipal : इचलकरंजीत भाजपची कसोटी; नवे-जुने संघर्षामुळे निवडणूक रंगात

SCROLL FOR NEXT