पुणे

भोर तालुक्यातील नागरिक रुग्णावाहिकेबद्दल नाराज

CD

भोर, ता. १० : तालुक्याच्या ग्रामीण भागातील नागरिक शासनाच्या १०८ क्रमांकावरून मिळणाऱ्या रुग्णवाहिकेच्या सेवेबाबत नाराजी व्यक्त करत आहेत. आरोग्य सेवा हवी असलेल्या रुग्णाला घरातून जवळच्या शासकीय रुग्णालयात किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा शासकीय रुग्णालयात नेले जाते.

पण रुग्णवाहिका चालकाकडून शासकीय रुग्णालयात रुग्णाला घेऊन जाण्यास नकार दिला जातो. भोर तालुक्याचा बहुतांश भाग हा दुर्गम आणि डोंगररांगांचा आहे. त्यामुळे रुग्णवाहिका पोहोचण्यास केवळ काही मिनीटे नव्हे तर काही तासांचा वेळ लागतो. अशावेळी संबंधित रुग्णास जवळच्या दवाखान्यात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले जाते. काही वेळा रोगाचे निदान होण्यासाठी खासगी दवाखान्यात दाखल केले जाते. रोगाचे निदान झाल्यानंतर संबंधित रुग्णास शासकीय रुग्णालयात दाखल करावे लागते.

अशा वेळी देखील १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा देत नाही. खासगी दवाखान्यातून शासकीय दवाखान्यात रुग्ण घेऊन जाण्यास परवानगी नसल्याचे सांगितले जाते. भोरच्या उपजिल्हा रुग्णालयात १०८ क्रमांकाची केवळ एकच रुग्णवाहिका आहे. ती रुग्णवाहिका इतर ठिकाणी आरोग्यसेवेसाठी गेली तर, दुसरी रुग्णवाहिका येण्यास काही तासांचा कालावधी लागतो. यामुळे भोर तालुक्यात १०८ क्रमांकावरून आरोग्यसेवा मिळण्याचे प्रमाण कमी आहे.


सद्यःस्थितीत पावसाळ्याच्या दिवसात अनेक अपघात, सर्पदंश, अतिवृष्टी व भूउख्कलन यासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या घटना घडत असतात. त्यामुळे निदान पावसाळ्यात दिवसात तरी १०८ क्रमांकाची आरोग्य सेवा विनातक्रार मिळावी अशी अपेक्षा ग्रामीण भागातील नागरिक व्यक्त करीत आहेत.


याबाबत १०८ क्रमांक रुग्णवाहिकेचे जिल्हा समन्वयक डॉ. प्रियांक जावळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, अपघातग्रस्त व्यक्तीला जरी खासगी दवाखान्यात दाखल केला असेल तरीदेखील त्याला १०८ क्रमांकाची रुग्णवाहीकेमधून शासकीय रुग्णालयात पाठविण्याची व्यवस्था केली जाणार. याखेरीज एखादा अपघात झाला, कोणाला भाजले,
कोणाला हृदयविकाराचा झटका आला तर नागरिकांनी ''डायल १०८ रुग्णवाहिका'' सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहनही डॉ. जावळे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT