पुणे

कारगिल युद्धात सहभागी झालेल्या माजी सैनिकांचा सत्कार

CD

भोर, ता. २६ : शहरातील सम्राट चौकातील विजयस्तंभास बुधवारी (ता. २६) कारगिल विजयी दिनानिमित्त माजी सैनिक सेवा संस्थेच्या वतीने अभिवादन केले. तसेच, कारगिल युद्धात सहभागी झालेल्या माजी सैनिकांचा प्रशासनाच्या वतीने प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांच्या हस्ते सन्मान केला.
माजी सैनिक सेवा संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब समगीर आणि सचिव विजय बर्के यांच्या हस्ते विजयस्तंभास पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी डॉ. सुरेश गोरेगावकर, डॉ. चंद्रशेखर राऊत, दीपक येडवे, संपत कोंडे आदी उपस्थित होते. कारगिल युद्धात सहभाग घेतलेल्या जवानांनी यावेळी युद्धातील आपले अनुभव सांगितले.
तसेच, टिटेघर (ता. भोर) येथील ‘ध्रुव प्रतिष्ठान’च्या वतीने अध्यक्ष राजीव केळकर आणि तालुका प्रशासनाच्या वतीने कचरे यांच्या हस्ते कारगिल युद्धातील सहभागी माजी सैनिकांचा सत्कार केला. कारगिल युद्धात सहभागी झालेले विजय बर्के, जहाँगीर आतार, अप्पासाहेब बागल, रामचंद्र पारठे, हनुमंत बांदल, किशोर सुर्वे, तुळशीराम संकपाळ व गेनबा शेलार यांचा यावेळी सत्कार केला.
‘‘युद्धात सहभागी झालेल्या सैनिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे, हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य असून, प्रत्यक्ष युद्धभूमीवर सहभागी झालेले माजी सैनिक हे भोर तालुक्याचे वैभव आहेत,’’ असे मत कचरे यांनी यावेळी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे पुन्हा चर्चेत ! 'एफडीए'च्या मोहिमेची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल; मुंबईतील कारवाईची जगभर होतेय चर्चा

IND vs WI T20I: वेस्ट इंडिजच्या ट्वेंटी-२० संघात बदल; भारताला झोडणाऱ्या खेळाडूची एन्ट्री, तिसरी वन डे जिंकल्यावर आलाय कॉन्फिडन्स...

'दृश्यम'च्या पहिल्या दोन भागात दिसला पण तिसऱ्यात नाही, मराठी अभिनेत्याला वाटतंय वाईट; म्हणतो - गायतोंडेने...

Latest Marathi News Live Update : नागपूर पदवीधर मतदारसंघात राजकीय समीकरणे बदलली; वंजारी, कोहळे यांच्यासह कराळे-सोलेही मैदानात?

Mumbai News: 'ती' चारचाकी आयात नव्हे! उच्च न्यायालयाचे सीमा शुल्क विभागाला आदेश

SCROLL FOR NEXT