पुणे

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने दक्षता जनजागृती

CD

भोर, ता. २ : शासकीय कार्यालयात शासकीय शुल्काव्यतिरीक्त इतर बाबींची किंवा लाचेची मागणी होत असेल, तर नागरिकांनी त्वरित लाचलुचपत विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यांत आले. शासनाच्या दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त मंगळवारी (ता. ३१) आठवडे बाजाराच्या दिवशी शहरात शासनाच्या वतीने जनजागृती करण्यात आली.
शहरातील तहसील, पंचायत समिती, नगरपालिका आदी कार्यालयांच्या परिसराबरोबर आठवडे बाजार, राजवाडा चौक व एसटी स्टॅंड या सार्वजनिक ठिकाणी जनजागृती केली. पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक श्रीराम शिंदे, पोलिस हवालदार एस. ए. काकडे व सौरभ महाशब्दे यांनी याबाबत नागरिकांना माहिती दिली. सर्वसामान्य नागरिकांना कोणताही शासकीय कर्मचारी अथवा लोकसेवक शासकीय काम करून देण्याकरता शासकीय शुल्का व्यतिरिक्त लाच अगर इतर बाबींची मागणी करत असेल, तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले. तक्रारींसाठी शासकीय कार्यालयाच्या दर्शनी भागात फ्लेक्स बॅनर लावून जनजागृती करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ओमानजवळ व्यापारी जहाजावर हल्ला! अमेरिकेविरोधात संतप्त भारताचा मोठा निर्णय; US राजदूतांना निषेधपत्र जारी

ENG vs NZ, Test: जो रुट पुन्हा झाला कर्णधार! नाईटक्लब घटनेनंतर बेन स्टोक्ससह ऍटकिन्सनही इंग्लंड संघातून बाहेर

Umarga Crime : सावकारी जाचातून महिला फार्मसिस्टचा विनयभंग; जिवे मारण्याची धमकी, तिघांवर गुन्हा दाखल

Narendra Modi: १२ वर्षांच्या कार्यकाळानंतर पंतप्रधान मोदींचा भावनिक सूर! नेहरूंचा विक्रम मोडल्यानंतर पहिली प्रतिक्रिया; काय म्हणाले?

काँग्रेसचा उमेदवार मॅनेज? कोट्यवधींच्या घोडेबाजाराचा आरोप, स्थानिक नेते संतप्त, दिवसभरात नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT