पुणे

भोलावड्यातील नळ योजनेच्या चौकशीची मागणी

CD

भोर, ता. ३ : शहराजवळील भोलावडे येथील राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेचे काम पाच वर्षांपासून सुरू असून अद्याप अपूर्णच आहे. तसेच पूर्ण झालेले कामही निकृष्ट दर्जाचे आहे. त्यामुळे संबंधित कामाची आणि ठेकेदाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सरपंच प्रवीण जगदाळे, उपसरपंच अविनाश आवाळे यांच्यासह काही सदस्यांनी केली.

याबाबत ग्रामपंचायतीकडून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
भोलावडे ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सरपंच जगदाळे यांनी माहिती दिली. यावेळी उपसरपंच अविनाश आवाळे, ग्रामपंचायत सदस्य गणेश आवाळे, प्रशांत पडवळ, ज्ञानेश्वर तारू, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष गजानन आवाळे उपस्थित होते.

भोलावड्यातील पाणीपुरवठा योजनेस २०१८-१९मध्ये चार कोटी ६९ लाख रुपये खर्चून काम सुरू करण्यात आले. यामध्ये विहीर, ५० हजार लिटरची पाण्याची टाकी, जलशुद्धीकरण प्लॅट आणि विविध प्रकारच्या पाईपची सुमारे १६ हजार मीटरची पाइपलाइन या प्रमुख कामांचा समावेश आहे.

या योजनेत तयार केलेला जलशुद्धीकरण प्रकल्प आणि पाण्याच्या टाकीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे त्यामधून पाण्याची गळती होत आहे. या अंतर्गत वितरण व्यवस्थेचे कामही अपूर्ण आहे. अद्याप वितरण लाइनच्या पाण्याची चाचणी घेतलेली नाही आणि योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित केलेली नाही. मात्र संबंधित ठेकेदारांनी बिल अदा केले आहे. परंतु आजपर्यंत गावाला या योजनेमधून पाणीपुरवठा झालेला नाही.

त्यामुळे निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायतीकडून करण्यात आली आहे. ठेकेदाराला कामाचे पैसे देऊ नये, म्हणून वारंवार जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्याकडे तोंडी, लेखी तक्रार करून कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याचे सरपंच जगदाळे यांनी सांगितले.

या योजनेची पाइपलाइन व पाण्याच्या टाकीचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून जलशुद्धीकरणाचे काम सुरू आहे. पुढील दोन महिन्यात टाकीत पाणी सोडून पाण्याची चाचणी करून योजना ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
- पोपट नलावडे, ठेकेदार कंपनीचे प्रमुख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : कालाय तस्मै नम:! चाकणकरांनी पीडितांना न्याय न दिल्यानं परतफेडीची वेळ, खरातला राजकीय पाठबळ; रोहिणी खडसेंचा घणाघात

मला अटक केली तर तुमच्यावर कोप होईल; अटकेआधी अशोक खरातची पोलिसांना धमकी; नेमकं काय म्हणाला?

मुलं नाही पण पुतण्या चालवतोय भरत यांच्या अभिनयाचा वारसा ! 'या' मालिकेत करतो काम

Video Viral : तिलक वर्माने विचारला सूर्या दादाला प्रश्न; उत्तर मिळाले, IPL 2026 मध्ये मी कर्णधार नाही, तू हार्दिकला विचार...

१९ वर्षीय तरुणीला परराज्यात नेत २ लाखांत विकलं, फसवून लग्न केलं अन् २ महिने लैंगिक अत्याचार

SCROLL FOR NEXT