पुणे

भोरमधील छाप्यांत २७ लिटर दारू जप्त

CD

भोर, ता. २९ : शहरातील नागोबा आळी आणि पिराचा मळा परिसरातील विनापरवाना दारूविक्री करणाऱ्या तीनजणांवर भोर पोलिसांनी मंगळवारी (ता. २८) रात्री कारवाई केली. त्यांच्याकड़ून २७ लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली आणि त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. भोर पोलिसांच्या पथकाने मंगळवारी रात्री सव्वाआठ ते पावणेनऊ या वेळेत शहरातील दोन ठिकाणी छापे टाकले. त्यामध्ये सागर दशरथ धोंडे (वय ३५, रा. नागोबा आळी), हनुमंत सोपान मळेकर (वय ४०, रा. पिराचा मळा, भोर) आणि मंगेश हनुमंत चिकणे (वय ४२, रा. नागोबा आळी) या तिघांना गावठी दारुची विक्री करताना पकडले. त्यांच्याकडून २ हजार ७०० रुपयांची २७ लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली. त्यांच्यावर दारुबंदी अधिनियमानुसार गुन्हा दाखल केले.
भोरचे उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बर्डे, भोरचे पोलिस निरीक्षक अण्णा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक दीप्ती करपे, पोलिस उपनिरीक्षक अनिल चव्हाण व पोलिस उपनिरीक्षक अशोक खुटवड यांनी पोलिस हवालदार उद्धव गायकवाड, विकास लगस, गणेश भिसे, अभय बर्गे यांनी ही कारवाई केली. पोलिसांनी तीनही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यांचा पुढील तपास पोलिस नाईक धर्मवीर खांडे व अतुल मोरे हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT