पुणे

भोरला कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

CD

भोर, ता. ३ : भोर शहर आणि तालुक्यातील २० कर्तृत्ववान महिलांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांच्या हस्ते महिलांना सन्मानित करण्यात आले.
छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या मैदानावर शनिवारी (ता. १) सायंकाळी झालेला कार्यक्रम पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक किरण दगडे-पाटील मित्र परिवाराच्या वतीने घेण्यात आला. यावेळी झालेल्या खेळ पैठणीच्या कार्यक्रमात महिलांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
सिनेअभिनेता क्रांतिनाना मळेगावकर आणि बालगायिका सह्याद्री मळेगावकर यांनी ‘न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. खेळ पैठणीच्या कार्यक्रमात शहर आणि तालुक्यातील २ हजारांपेक्षा जास्त महिला उपस्थित होत्या. रेश्मा अंकुश कांबळे यांनी होम मिनिस्टरमध्ये प्रथम क्रमांक पटकावून स्कूटीचे बक्षीस जिंकले. अक्षदा संपत गायकवाड यांनी द्वितीय क्रमांकाचा एलईडी टीव्ही पटकाविला तर पुष्पा गोविंद म्हेत्रे यांनी तिसऱ्या क्रमांकाच्या बक्षीसाचा फ्रिज पटकाविला. याशिवाय श्रद्धा संदीप कांबळे यांनी पीठाचीगिरणी, अश्विनी व्यंकटेश शिंदे यांनी शिलाई मशिनचे पारितोषिक पटकाविले. याखेरीज १०० महिलांना उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून पैठणी देण्यात आली.
यावेळी आयोजक किरण दगडे पाटील, बावधन (ता. मुळशी) च्या सरपंच पियुषा दगडे पाटील, सैराट फेम सिनेअभिनेते आकाश ठोसर आणि देवमाणूस फेम किरण गायकवाड, भाजपचे तालुकाध्यक्ष जीवन कोंडे, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब गरुड, युवानेते राहुल दगडे पाटील, राजगडचे तालुकाध्यक्ष आनंद देशमाने, अप्पासाहेब चोंधे, अमर बुदगुडे, भोर शहराध्यक्ष सचिन कण्हेरकर, शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष केदार देशपांडे, आशा शिवतरे, अतुल काकडे, सोमनाथ ढवळे, भोलावडे गावचे सरपंच प्रवीण जगदाळे, कुणाल धुमाळ, स्वाती गांधी, दत्तात्रेय नवघणे, लता बांदल, रोहन भोसले, सुशांत लोखंडे, समाधान पारठे, शुभम बेलदरे, समीर घोडेकर, अमर बुदगुडे आदींसह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT