पुणे

भोरमधील मतदारांची उत्सुकता शिगेला

CD

भोर, ता. ४ : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला मंगळवारी (ता.४) सकाळी आठ वाजता सुरुवात झाल्यानंतर ३५ बारामती लोकसभा मतदारसंघातील २०३ भोर विधानसभा मतदारसंघात असलेल्या भोर तालुक्यात मतदारांची उत्सुकता शिगेला पोचली होती.
पहिल्या फेरीपासून महायुतीच्या सुनेत्रा पवार की महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे यांच्यापैकी पुढे कोण याची माहिती घेतली जात होती. अनेक न्यूज चॅनेल, दैनिकांच्या ऑनलाइन बातम्या आणि मतमोजणी केंद्रावरून सोशल मीडियावर अपलोड झालेली माहिती पाहण्यासाठी अनेक जण मोबाईलवर लक्ष ठेवून होते. कामाच्या ठिकाणीही लोक कामधंदा सोडून मोबाईलवर निकालाची अपडेट घेत होते.
गॅरेजमध्ये दुचाकी दुरुस्तीला आणल्यानंतर काम करण्याशिवाय कामगार, गॅरेज मालक आणि ग्राहकही मोबाईलमध्ये निकालाची अपडेट घेताना दिसत होते. मोबाईलवरील सोशल मीडियावर सुप्रिया सुळे मताधिक्याने पुढे असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याची खात्री करण्यासाठी इतरांना फोन करण्यात येत होते.

व्हिडिओ कॉल करून एकमेकांना शुभेच्छा
सुप्रिया सुळे अमुक हजारांनी पुढे आहेत, तर आता अमुक फेरीत मतमोजणी कुठल्या तालुक्याची सुरू आहे. याबाबतच्या माहितीची खातरजमा करण्यात येत होती. काहीजण तर एकमेकांना व्हिडिओ कॉल करून शुभेच्छा देत होते. वातावरणात उन्हाचा तडाखा असल्यामुळे आडोशाला सावलीत बसून अनेक जण मतमोजणीच्या फेऱ्यांचा निकाल पाहत होते.

03662

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Ganesh Idol Collapse : कोल्हापुरात मानाची २१ फुटी गणेशमुर्ती कोसळली, वीजवाहिनीचा धक्का लागला अन् गोखले कॉलेज चौकातील घटना

Bhiwandi News: माझ्या मुलाला फाशी द्या! भिवंडीतील हाय-प्रोफाईल सामूहिक अत्याचाराच्या प्रकरणात आईची मागणी

'अरे हा तर आजोबा राजेश खन्नासारखा दिसतो' अक्षय-ट्विकलचा मुलगा आरवला पाहून चाहते शॉक, Viral Video

Maharashtra Ganesh Visarjan Live: मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीत स्व-रूपवर्धिणी मल्लखांब पथकाचे थरारक सादरीकरण

Air India Pilot Alcohol Test : एअर इंडियाचा वैमानिक दारू पिऊन विमानात, झ्युरिच विमानतळावरील उड्डाणापूर्वीची घटना, थेट केलं निलंबन

SCROLL FOR NEXT