पुणे

निवंगण येथे गोठ्यात घुसून बिबट्याचा बैलावर हल्ला

CD

भोर, ता. ८ ः निवंगण (ता.भोर) येथे बिबट्याने भरवस्तीतील घरातील गोठ्यात घुसून बांधलेल्या बैलावर हल्ला केला. हल्ल्यात बैल गंभीर जखमी झाला आहे. शुक्रवारी (ता.८) सकाळी सहा वाजता घडली.

भोर तालुक्याच्या नीरा-देवघर धरणाच्या दक्षिणेकडील हिरडस मावळ खोऱ्यात असलेल्या निवंगण येथील अलका डोईफोडे यांच्या घरात शुक्रवारी सकाळी सहा वाजता बिबट्याने प्रवेश केला. घरामध्ये वृध्द आजी आणि लहान मुले अंगावर पांघरून घेऊन झोपले होते. त्यांच्या बिछान्यावरून जाऊन बिबट्याने बाजूच्या पडवीत असलेल्या गोठ्यातील बैलावर हल्ला केला. परंतु, आजीला जाग आली आणि तीने आरडाओरडा केला. त्यावेळी बिबट्याने घाबरून धूम ठोकली. सुदैवाने बिबट्याच्या हल्ल्यात बैल दगावला नाही. अलका डोईफोडे यांनी निवंगण गावचे सरपंच राजू दिघे व माजी सरपंच किसन दिघे यांना सांगितली. त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि वनविभागाला घटनेची माहिती दिली. त्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. घरात घुसून बिबट्याने केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या बैलाची भरपाई देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT