पुणे

दूषित पाणी पुरवठ्यामुळे आरोग्य धोक्यात

CD

भोर, ता. १० : भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात प्राचीन वास्तूकलेचे वैभव असलेल्या कांबरे बुद्रुक गावास अद्यापही पाणीयोजना मंजूर नाही. दूषित पाणी प्यावे लागत आहे. आरोग्य धोक्यात आल्याने नाराजी त्रस्त नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. यामुळे ५०० लोकवस्ती असलेल्या गावास योजनेची प्रतीक्षा लागली आहे.

कांबरे गावात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कांबरेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. केवळ उन्हाळ्यात केवळ चारच महिने पाण्याबाहेर येते. मंदिराशेजारी असलेल्या आडातून कांबरे ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा केला जातो. परंतु उन्हाळ्यात धरणातील पाणीसाठा कमी झाल्यानंतर मंदिर उघडे पडते आणि आडातील पाणीसाठाही कमी होतो. ग्रामपंचायतीच्या वतीने मागील पंधरावड्यात आडातील गाळ काढून खोलीकरण केल्याने पाणीसाठा वाढला. परंतु पावसामुळे पाणी पुन्हा गढूळ झाले. त्यामुळे ग्रामस्थांना अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे. ग्रामस्थ सध्या पाण्यात तुरटी फिरवून आणि उकळून पाणी पीत आहेत. मंदिर पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांनाही ग्रामपंचायतीकडून पिण्याचे पाणी देता येत नाही.

पंचायत समितीकडे टँकरची मागणी
पावसाळ्यात गावाला धरणातील पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र अद्याप एकही पाणीपुरवठा योजना कार्यरत नाही. ग्रामपंचायतीने पाण्यासाठी पंचायत समितीकडे टँकरची मागणी केली आहे. परंतु कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजनेसाठी ग्रामपंचायतीच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. याबाबत सरपंच मनीषा ओंबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की शासनाकडे जलजीवन योजनेच्या माध्यमातून विहीर, पाण्याची टाकी आणि वितरण व्यवस्था यासाठी नवीन योजनेसाठी पाठपुरावा सुरू आहे.


कांबरे येथील धरणातील प्राचीन मंदिराचा आणि त्याशेजारी गाळात गाडलेल्या दोन छोट्या तळ्यांच्या संवर्धनासाठी पुरातत्व विभाग आणि इतर विभागांशीही पत्रव्यवहार सुरू आहे. कांबरेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार आणि ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी ग्रामपंचायतीकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.
- मनीषा सुदाम ओंबळे, सरपंच कांबरे बुद्रूक

03695

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT