पुणे

भोरच्या ग्राहकांची शेतकऱ्यांच्या बियाण्यांना पसंती

CD

भोर, ता. ११ : खरीपाच्या पेरणीकरिता बियाणे खरेदी करण्यासाठी दुकानांमधील पॅकबंद बियाणांपेक्षा शेतकऱ्यांकडील खात्रीलायक बियाणे खरेदी करण्यासाठी ग्राहक पसंती देत आहेत. मंगळवारी (ता.११) भोर येथे आठवडे बाजारात तालुक्याच्या ग्रामीण भागातील शेतकरी महिलांनी आपल्या शेतात देशी बियाणांचे उत्पादन केलेले बियाणे विक्रीसाठी आणले.

यामध्ये भुईमूग (शेंगदाणे), गावरान वाटाणे, तीन प्रकारचे घेवडे, चवळी, हरभरे, पांढरे व काळे तीळ अशा प्रमुख पिकांच्या बियाणांचा समावेश आहे. शेतीसाठी सध्या खते व इतर साहित्याची खरेदी करावी लागते. त्यासाठी महिला शेतकरी घरातील कडधान्याचे बियाणे विकून पैसे उभे करतात आणि त्या पैशामधून खते व शेतीच्या इतर साहित्याची खरेदी करतात. यावेळी बाजारात किलोला सर्वाधिक २०० रुपये दर हा भुईमूग आणि वाटाण्याच्या बियाण्यांना होता. याशिवाय इतर सर्व प्रकारच्या बियाण्यांसाठी १०० ते १५० रुपये दर होता. खासगी कंपन्यांचे बियाण्यांची खात्रीही मिळत नाही. म्हणून ग्राहक बाजारातील शेतकऱ्यांच्या घरातील आपल्याच भागातील मातीमध्ये तयार खात्रीलायक बियाणे खरेदी करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Irani Cup 2026: रिषभ पंतच्या नेतृत्वातील संघ ठरला चॅम्पियन! फायनलमध्ये रणजी ट्रॉफी विजेत्यांना केलं पराभूत

भाकरीसोबत तोंडाला पाणी आणणारी गोळ्याची आमटी; पाहा खानदेशी पद्धतीची रेसिपी; GOLYACHI AAMTI RECIPE

Latest Marathi News Live Update : मालेगाव मध्ये तापमान 38.2 अंशावर पोहचले

France Student Protests : फ्रान्समधील विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण; ४ हजार जणांना अटक, २०० जण जखमी

वय वाढण्याआधीच मानेवर रेषा दिसू लागल्यात? या टेक लाइन्स घालवण्यासाठी जाणून घ्या डॉक्टरांनी सांगितले ४ सोपे व्यायाम

SCROLL FOR NEXT