पुणे

रायरेश्‍वर दिंडी पंढरीकडे मार्गस्थ

CD

भोर, ता. ३ : भोरचे दिवंगत माजी आमदार संपतराव जेधे यांनी सुरू केलेल्या रायरेश्वर ते पंढरपूर पायी दिंडीचे बुधवारी (ता .३) सकाळी भोरहून पंढरपूरकडे प्रस्थान झाले. दिंडीचे हे ४६ वर्ष असून भोरमधील ही सर्वात पहिली आणि सर्वात मोठी दिंडी आहे. सोमवारी (ता. १) सकाळी रायरेश्वर किल्ल्यावरून निघालेल्या पायी दिंडीचा भोरमधील दुसरा मुक्काम संपल्यानंतर दिंडी मार्गस्थ झाली. संपतराव जेधे यांच्या भोरमधील घरासमोर दिंडीतील संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे आणि रथाचे पूजन करण्यात आले. राजगड ज्ञानपीठच्या मानद सचिव स्वरूपा थोपटे आणि तहसीलदार सचिन पाटील यांच्या हस्ते माऊलींच्या पादुकांचे आणि रथाचे पूजन करण्यात आले. यावेळी दिंडीचे अध्यक्ष रामदास जेधे, उपाध्यक्ष प्रदीप शिंगारे, दिंडी प्रमुख नामदेव महाराज किंद्रे, बापू महाराज कंक, राजीव केळकर, गीतांजली शेटे, नंदा जाधव, नितीन जेधे, पंढरीनाथ भिलारे, विजय गोळे, डॉ. सुरेश गोरेगावकर, डॉ. आनंदा कंक, डॉ. अण्णासाहेब बिराजदार उपस्थित होते.
दिंडी प्रमुखांच्या वतीने चौपाटी येथील छत्रपती शिवरायांच्या अश्‍वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. संजय गोळे, सुनील गोळे यांच्या वतीने वारीतील सर्व भाविकांना अल्पोपहार देण्यात आला.
नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन भोर शाखा व भोर तालुका डॉक्टर असोसिएशन यांच्या वतीने वारकऱ्यांच्या हस्ते दिंडी मार्गावर वृक्षारोपण करण्यात आले. भोर तालुका केमिस्ट असोसिएशन, तालुका पत्रकार संघ आणि ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने सर्व भाविकांना अत्यावश्यक औषधांचे किट वाटप करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गुन्हा कबूल केलाय, तक्रारदाराची तक्रारच संशयास्पद; खरातच्या वकिलांनी कोर्टात काय सांगितलं?

Why Stock Market Crash Today: काल तेजी, आज क्रॅश! शेअर बाजार अचानक का कोसळला? जाणून घ्या 5 मोठी कारणं

Ashok Kharat: भोंदू बाबाची 'स्पेशल २६ टीम'... बनावट छापे टाकण्यात अन् व्यापाऱ्यांना धमकावून जाळ्यात ओढण्यात माहिर

Baramati By-Election : मोठी बातमी ! बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार, मल्लिकार्जून खर्गेंचे शरद पवार यांना आश्वासन

तरुणीच्या विनयभंग प्रकरणात अटक होईल, ५५ वर्षीय प्राचार्याला धमकावत ७ लाख उकळले; PSI, रिलस्टार महिला पोलिसासह तिघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT