भोर, ता. २७: तालुक्यात मागील चार दिवसांच्या मुसळधार पावसानंतर सोमवारी (ता.२६) ऊन पावसाचा खेळ सुरू झाला. दिवसभरात अनेक वेळा पावसाच्या सरी कोसळत असूनही अधून-मधून ऊन पडत आहे. त्यामुळे सह्याद्रीच्या डोंगररांगा, धरणे आणि नद्यांमधील फेसाळत असलेले पाणी आणि दऱ्या-खोऱ्यांमधील हिरवेगार निसर्गसौंदर्य याशिवाय हिरवळीतून जाणारे पावसाने ओले झालेले डांबराचे रस्ते पाहण्यास पर्यटक पुन्हा भोरच्या परिसरात येत आहेत.
ऊन-पावसाच्या खेळात आकाशात कित्येक वेळा इंद्रधनुष्य पडताना दिसत आहे. पावसाच्या सरींसोबत मध्ये-मध्ये पडणाऱ्या सूर्याच्या किरणांमुळे डोंगरांचे मनमोहक दृश्य पाहण्यास मिळत आहे. भातखाचरांमधील हिरवीगार भातशेती पाहिल्यानंतर शेतकरी आनंद व्यक्त करीत आहेत. केवळ निसर्गसौदर्य आणि धार्मिक स्थळांशिवाय रायरेश्वर, रोहिडेश्वर, वरंधा घाटमाथा येथे ट्रेकींगसाठी अनेक हौशी पर्यंटक येत आहेत. तालुक्याच्या आंबवडे खो-यात रायरेश्वर किल्याच्या बाजूला सोमवारी (ता.२७) सकाळी आकाशात एक इंद्रधनुष्य बराच वेळ दिसत होता. अनेक निसर्गप्रेमींनी इंद्रधनुष्याचे छायाचित्र काढण्यात वेळ घालवला.
04085
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.