भोर, ता. ३ : शहरातील वाघजाईनगर येथील भोरचे ग्रामदैवत समजल्या जाणाऱ्या श्री वाघजाई देवीच्या मंदिर परिसरात शारदीय नवरात्र उत्सवास सुरुवात झाली. वाघजाई देवीची गुरुवारी (ता.३) पहाटे विधीवत पूजा करून मंदिरात घटस्थापना करण्यात आली.
श्री वाघजाई देवी ट्रस्टचे अध्यक्ष जगन्नाथ भेलके पाटील, सचिव सुरेश गुजराती व यशवंत डाळ यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. यावेळी ट्रस्टचे व्यवस्थापक लक्ष्मण शंकर राऊत, केशव पवळे, बलदेव बांदल, निवृत्ती किवळे, आनंता शिर्के, सागर शेटे, दिलीप मळेकर, डॉ उदय पेंडसे, समेश संघवी, गणेश बांदल, रवींद्र कोंढाळकर, सचिन तारू व शैलेश कांबळे आदी संचालकांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
तनिष्का मोझर यांनी मंदिर परिसरात रांगोळी काढली, नऊ दिवस चालणाऱ्या या नवरात्र उत्सवात दररोज महापूजा, महा अभिषेक, भजन, श्रीसुक्त, महाभोंडला आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. याशिवाय मंदिर परिसरात खाऊ गल्ली आणि विविध प्रकारची खेळणी असलेले खेळीयाड तयार करण्यात आले आहेत. याशिवाय मंदिरात दररोज चिखलावडे, पाले, खानापूर, नागोबा आळी, नामदेव जनाबाई संत सेवा संस्था, विठ्ठल मंदिर भेलकेवाडी, भोईराज भजनी मंड़ळ येथील भजनी मंडळांचे सदस्य भजन गायन करणार आहेत. .
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.