पुणे

भोरला शनिवारपासून साहित्य संमेलन

CD

भोर, ता. ११ : येथील फुले शाहू आंबेडकर विचार प्रसारक मंडळाच्या वतीने शनिवारी (ता. १४) आणि रविवारी (ता. १५) राष्ट्रीय स्तरावरील १० व्या फुले शाहू आंबेडकर विचार प्रसार साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. भोरमधील छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या मैदानावर दोन दिवस होणाऱ्या या साहित्य संमेलनात विचारांचा जागर होणार आहे.
‘सकाळ’चे संपादक सम्राट फडणीस यांच्या हस्ते शनिवारी (ता. १४) ध्वज वंदन आणि संविधान फेरीने संमेलनाची सुरुवात होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरद गायकवाड हे संमेलनाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. अशी माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष रोहिदास जाधव, डॉ. सुरेश गोरेगावकर यांनी दिली. अनंतराव थोपटे महाविद्यालय, तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालय, भोर हेल्थ ॲण्ड सोशल फाउंडेशन आणि समविचारी संस्थांच्या सहकार्याने हे संमेलन होणार आहे.
छत्रपती शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंतीचे वर्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या ‘बहिष्कृत हितकारिणी सभे’चे शताब्दी महोत्सवी वर्ष आणि भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पार्श्‍वभूमीवर होणाऱ्या या संमेलनास विशेष महत्त्व राहणार आहे.
शनिवारी दुपारी १ वाजता सम्राट फडणीस यांच्या हस्ते संमेलनाचे ध्वजवंदन होऊन संविधान सन्मान फेरीला प्रारंभ होणार आहे. यासाठी औंध येथील उरो रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अभिजित होसमनी, होप रुग्णालयाचे प्रमुख डॉ. अमोल देवळेकर आणि क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मेश्राम उपस्थित राहणार आहेत. यावेळी होणाऱ्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्‍घाटन कश्यप साळुंके, अध्यक्ष सॉलिसिटर प्रसाद शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.
रविवार (ता. १५) सकाळी खासदार चंद्रशेखर आझाद यांच्या हस्ते संमेलनाचे उद्‍घाटन होणार असून साहित्यिक डॉ. शरद गायकवाड हे संमेलनाचे अध्यक्ष आहेत. प्रमुख पाहुणे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के, राजगड ज्ञानपीठचे कार्याध्यक्ष माजी आमदार संग्राम थोपटे, उद्योजक चंद्रकांत जगताप आदी उपस्थित राहणार आहेत.
या संमेलनात ‘दिवंगत खासदार बाळासाहेब साळुंके स्मृती सन्मान पुरस्कार’ माजी मंत्री तथा नागपूरचे साहित्यिक आमदार डॉ. नितीन राऊत यांना आणि ‘छत्रपती शाहू महाराज-पिलर ऑफ एज्युकेशन’ हा पुरस्कार रयत शिक्षण संस्थेचे संघटक डॉ. अनिल अप्पासाहेब पाटील यांना प्रदान करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, SA vs NZ Semi: दक्षिण आफ्रिकेसोबत चिटिंग झाली? एडन मार्करमची विकेट ढापली? 'त्या' कॅचवरून वाद पेटला Video

Latest Marathi News Live Update : नोकरीच्या आमिषाने १६ जणांची फसवणूक

Ladki Bahin Yojana : केवायसी करूनही मिळेना लाडक्या बहिणींना दरमहा अनुदान

Iran-Israel War: इराणच्या युद्धात मुंबईच्या तरुणाचा मृत्यू; ड्रोन हल्ल्यात भारतातील तिघे ठार

Mumbai News: व्हॉट्सॲप चॅट घटस्फोटाचे कारण असू शकत नाही - उच्च न्यायालय

SCROLL FOR NEXT