पुणे

पोंबर्डी, वेनवडीत रानडुकरांचा धुमाकूळ

CD

भोर, ता. ७ : शहराजवळील शिरवलीतर्फे भोर, पोंबर्डी, वेनवडी, आंबेघर आणि पिसावरे परिसरातील शेतांमध्ये पेरणी केलेल्या शेतांमध्ये रानडुक्करांनी धुमाकूळ घालून शेत उकरून बियाणे खाऊन टाकले आहेत. यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे.

बियाणे उगवून येण्यापूर्वीच ते नष्ट झाल्यामुळे शासनाकड़ून किंवा वन विभागाकडून कोणत्याही प्रकारची नुकसानभरपाई मिळत नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून रानडुक्करांपासून शेतीचे रक्षण कशा प्रकारे करावे यासाठी शेतकरी प्रयत्न करीत आहेत. शिरवली तर्फे भोर गावातील समाधान चौधरी, लक्ष्मण कुडले, रामचंद्र झांजले, सतीश गिरे, रामचंद्र चव्हाण, कांता गिरे आणि उत्तम गिरे यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी पेरलेले बियाणे रानडुक्करांनी नष्ट केले आहे.
भोरच्या परिरसात रात्रीच्या वेळी रानडुक्करे खाण्यापिण्यासाठी झुंडीने सर्वत्र फिरत असतात. पेरणी केलेल्या शेत उकरून नांगरल्यासारखे करतात. त्यामुळे बियाणे उगवून येण्याअगोदरच नष्ट केले जात आहेत. रानडुक्करांचा बंदोबस्त करण्यासाठी काही शेतकऱ्यांनी कुत्रे भुंकलेल्या आवाजाचे रेकॉर्डिंग रात्रभर शेताच्या बांधावर वाजवित आहेत. त्यामुळे रानडुक्करांचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी होत आहे. परंतु कुत्र्याच्या भुंकण्याच्या आवाजाचे रेकॉर्डिंग आणि स्पिकरचा खर्चही जास्त आहे. त्यामुळे सर्वच शेतकऱ्यांना ते वापरणे शक्य होत नाही. याबाबत भोर वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी राऊत यांच्याशी संपर्क साधला असता पेरलेले बियाणे उगवून येण्यापूर्वीच जर वन्य प्राण्यांमुळे नष्ट झाले तर वन विभागाकडून कोणतीही मदत मिळत नसल्याचे सांगितले.


भुईमूगाचे बियाणे शनिवारी दुपारी पेरले आणि संध्याकाळपर्यंत वाफे तयार केले. मात्र रविवारी सकाळी शेतात गेलो तर रानडुक्करांनी संपूर्ण शेत नांगरल्यासारखे उकरून टाकले. त्यामुळे बियाणांचा आणि पेरणीचा खर्च वाया गेला आहे. आता दुबार पेरणी करावी लागणार आहे.
- समाधान चौधरी, शेतकरी शिरवलीतर्फे भोर.

04756

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

Dubai Call Center Scam: वाघोलीतील उद्योजकाची ७० लाख ८५ हजारांची फसवणूक; दुबई कॉल सेंटर रॅकेट उघड, गुजरातच्या टोळीवर गुन्हा

BJP Ideology Camp: भाजप-आरएसएस प्रशिक्षण शिबिरात नगरसेवकांना वैचारिक धडा; ध्येयधोरणांपासून भटकू नका, कान टोचले

Crude Oil Crisis: इंधन दरवाढीविरोधात उद्या राज्यभर आंदोलन! तुमच्या शहरात पेट्रोलचे भाव किती?

SCROLL FOR NEXT