पुणे

कासुर्डी गुमा येथील फलक काढण्याची मागणी

CD

भोर, ता. ३० : पुणे-कापूरव्होळ-भोर मार्गावरील कासुर्डी गुमा (ता.भोर) येथील पुलाच्या कठड्याला लागून असलेले धोकादायक फलकामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. पुलाच्या भिंतीला लागून असलेले धोकादायक होर्डिंग हटविण्याची मागणी केली जात आहे.
भोर-कापूरव्होळ मार्गावरील कापूरव्होळ फाटा ते कासुर्डी गुमा दरम्यान अनेक मोठमोठे होर्डिंग उभे करण्यात आले आहेत. कासुर्डी गुमा येथील पुलाच्या दक्षिणेकडील टोकाला पुलाच्या भिंतीला लागून दोन्ही बाजूला दोन होर्डिंग उभारण्यात आलेले आहेत. यावर मोठ्या प्रमाणात रंगीबेरंगी जाहिराती केल्या जात आहेत. मात्र पुलाच्या दोन्ही कडेला वळणे असल्यामुळे आणि होर्डिंगवरील जाहिरातीमुळे वाहनचालकांचे लक्ष विचलीत होत असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्या ठिकाणी दुचाकींचे छोटे-छोटे अपघात झालेले आहेत. यासाठी शासनाने धोकादायक होर्डिंग हटवावेत अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता योगेश मेटेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, ‘संबंधित होर्डिंगच्या मालकाला यापूर्वी नोटीस दिलेली आहे. आता पुन्हा निर्धारित कालावधीत होर्डिंग हटविण्यासाठी नोटीस देण्यात येणार आहे. तरीदेखील होर्डिंग न हटविल्यास पोलिस बंदोबस्तात होर्डिंग काढून टाकण्यात येतील.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad for ICC Women’s T20 World Cup 2026 : वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; सलामीला पाकिस्तानशी भिडणार, जाणून घ्या खेळाडूंची यादी अन् संपूर्ण वेळापत्रक

Kanker IED Blast: छत्तीसगडमध्ये मोठा आयईडी स्फोट! ३ जवान शहीद तर १ जखमी, कशी घडली घटना?

भारताच्या प्रगतीचं पाककडून कौतुक! भारत खूप पुढे गेलाय आम्ही मागे आहोत...पाकिस्तानी मंत्र्यांची स्पष्ट कबुली

मुंबईकरांसाठी दिलासा! ११ किमीचा सिग्नल-फ्री कॉरिडोर तयार; ट्रॅफिकमधून सुटका होणार, मार्ग कुठून कुठे असणार?

Latest Marathi News Live Update : नागपुरात मुख्यमंत्री फडणवीसांचा दौरा; मेयो रुग्णालयासह विकासकामांची पाहणी

SCROLL FOR NEXT