पुणे

थोपटे महाविद्यालयातील ब्रोकोलीचा लागवड

CD

भोर, ता. १५ : येथील राडगड ज्ञानपीठाच्या अनंतराव थोपटे महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी आवारात पॉली हाऊसमध्ये
ब्रोकोली भाजीची लागवड केली व १२० दिवसांत पाच गुंठ्यांत सुमारे ४०० किलो उत्पादन घेण्यात आले.

महाविद्यालयातील हॉर्टिकल्चर विभागाचे प्रमुख डॉ. परशुराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी राबविलेला उपक्रम यशस्वी झाला आहे. थोपटे महाविद्यालयाच्या परिसरातील रिकाम्या जागेत शास्त्रोक्त पद्धतीने भाजीपाला तयार करण्याची कल्पना पाटील यांनी मांडली. त्यास प्रभारी प्राचार्य एस. आर. नेवसे यांनी सहमती दर्शवली. विलायती कोबीवर्गीय ब्रोकोलीचे उत्पादन उघड्यावर तसेच बंदिस्त जागेत ही घेतले जाते. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे पॉली हाऊसमध्ये ब्रोकोलीची लागवड करण्यात आली.

लागवडीपूर्वी गादी वाफे बनवून ते फारमेलीन ने निर्जंतुक करण्यात आले. वाफे तयार झाल्यावर त्यामध्ये हायटेक नर्सरी शिरगाव, पुणे येथून रोपे आणून लागवड करण्यात आली. जलसिंचनासाठी ठिबक सिंचन आणि आर्द्रता व्यवस्थापनासाठी फॉगरची सोय करण्यात आली. खत व्यवस्थापनासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केला. ब्रोकोली लागवडीनंतर पंधरा दिवसांनी व एक महिन्यानंतर खताचे डोस फर्टीगेशन द्वारे देण्यात आले. एक महिन्यानंतर मायक्रोझिला हे सुक्ष्मखत दिले. गोल या कीटकनाशकाची एक फवारणी दिली.
सामान्य लोकांच्या खिशाला न परवडणारी पण आहार दृष्ट्या खूप फायदेशीर भाजी आहे. पुण्या-मुंबईसारख्या शहरामध्ये ब्रोकोलीला प्रती किलोस २०० ते ४०० रुपये दर मिळत आहे.


दरम्यान, डॉ. परशुराम पाटील यांच्या योग्य व्यवस्थापनामुळे ब्रोकोलीचे चांगले उत्पादन झाले. याबद्दल राजगड ज्ञानपीठाचे कार्याध्यक्ष माजी आमदार संग्राम थोपटे व सचिव स्वरुपाताई थोपटे यांनी डॉ पाटील यांच्यासह विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.


ब्रोकोलीचे मुख्य फायदे
*रोगप्रतिकारशक्ती वाढवते - ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि आजारांपासून संरक्षण करतात.
*रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते -ब्रोकोली रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो.
*हृदयविकार आणि कर्करोगाचा धोका कमी करते - ब्रोकोलीतील अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर हृदयविकार आणि कर्करोगाचा धोका कमी करतात.
*वजन कमी करण्यास मदत करते - ब्रोकोलीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने ती वजन कमी करण्यास मदत करते.
*हाडांसाठी फायदेशीर - ब्रोकोलीमध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन के असते, जे हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत.


05191

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला शिक्षकाकडून बेदम मारहाण; जिल्हा परिषद शाळेतील संतप्त प्रकार, प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

Junnar Crime : लग्नास नकार; जुन्नरमध्ये विद्यार्थिनीवर तरुणाचा कोयत्याने हल्ला, विद्यार्थिनी गंभीर जखमी

Hardik Pandya: हार्दिक पांड्याविरोधात पुणे पोलिसात तक्रार; तिरंग्याचा अवमान केल्याचा आरोप

Cyber Crime : दहा कोटींच्या सायबर फसवणूकप्रकरणी सोलापूरमधून आरोपीला अटक

Monalisa Marriage: मुस्लिम तरुणासोबत लग्न केलं; पण वडिलांची भीती, घाबरलेल्या मोनालिसाची पोलिसात धाव अन्... व्हायरल गर्ल पुन्हा चर्चत

SCROLL FOR NEXT