भोर, ता. २७: पिसाळलेला कुत्रा चावल्यामुळे शहरातील दहा जण जखमी झाले. सोमवारी (ता .२६) सायंकाळी शहरात एक पिसाळलेला कुत्रा फिरत होता. त्याने श्रीपतीनगर, नवीआळी व वेताळ पेठ या भागातील रस्त्यावरून जाणाऱ्या सहा नागरिकांना चावा घेतला. पिसाळलेला कुत्रा कोणताही आवाज न करता जवळ येऊन नागरिकांच्या पायाला किंवा हाताला चावा घेत होता. चावा घेतल्यानंतर तो लगेच पळून जात होता. त्यामुळे त्याला पकडता आले नाही. मंगळवारी (ता.२८) सकाळपासूनच त्या कुत्र्याने चौपाटी परिसरात धिंगाणा घातला. कुत्र्याने चावलेल्या सर्वांनी भोरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेतले. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास श्रीपतीनगरमधील एका बंगल्याच्या पार्किंगमध्ये कुत्रा शिरला. संबंधित व्यक्तींनी पार्किंगचे दरवाजे बंद करून त्यास कोंडून ठेवले. नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख महिंद्र बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली ऋषिकेश शेटे, दत्ता जगताप, नाना वाघोले, सागर पवार, बाबू माने व दत्ता पवार या कर्मचाऱ्यांनी एका तासाच्या प्रयत्नानंतर त्या कुत्र्यास जरबंद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.