पुणे

भोरमधील सौंदर्यामुळे मिळते स्वर्गीय सुखाची अनुभूती

CD

रिमझिम बरसणाऱ्या जलधारा... ऊन सावल्यांच्या खेळात अवतरणारा इंद्रधनुष्य...वनराईने नेसलेल्या हिरवा शालू... ओलिचिंब झालेली धरणी... खळखळणारे धबधबे...निसर्गाचा
स्वर्गीय चित्तवेधक नजराणा... नयनरम्य सौंदर्य पाहून हरखून गेलेले मन. अशा आनंदी, उत्साही वातावरणात पर्यटनासाठी जिल्ह्यातील भोर, जुन्नर, मुळशी, खेड तसेच विविध गडकिल्ले, पर्यटनस्थळे, धबधबे आणि मंदिरांमध्ये पर्यटकांच्या गर्दीचा आलेख उंचावत आहे. यामुळे श्रावण महिन्यात सौंदर्य अधिक खुलणार असल्याने काहीजण पर्यटनाची जय्यत तयारी करीत आहेत.

भोर, ता. २० : निसर्गसंपन्न परिसर... सोसाट्याचा घोंगावणारा वारा... हिरव्यागार झाडावरील अन्‌ उंच डोंगरांवरील हिरवाई... पक्ष्यांचा किलबिलाट... घाटातील
नागमोडी रस्ते आणि धरणांमध्ये साठलेले अथांग पाणी म्हणजे जणू काही स्वर्गाचा अनुभव घेता येतो. याशिवाय पावसाळी पर्यटनासाठी कुटुंबासह फिरायला येण्यासाठी सुरक्षीत असलेला आणि विनात्रास होणारा प्रवास. यामुळे पुण्या-मुंबईसारख्या शहरातील हौशी पर्यटक पावसाळी पर्यटनासाठी भोरच्या परिसरास पसंती देत आहेत.

पर्यटकांसाठी व्यावसायिकांकडून
तालुक्यात पावसाळी पर्यटनासाठीच्या स्थळांच्या सोबत परिसरातील हॉटेल्स, ढाबे, फार्म हाऊस आणि लॉजिंगही अत्यल्प दरात उपलब्ध आहेत. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हॉटेल्स व्यावसायिकांनी सेवा सुविधांमध्ये वाढ केली आहे. तालुक्यातील जादा तर हॉटेल्स व फार्म हाऊस हे भाटघर आणि नीरा-देवघर धरणांच्या किणाऱ्यालगतच्या भागात आहेत. सर्वाधिक हॉटेल्स ही भाटघर धरणाच्या पश्चिमेकडील किणाऱ्यावरील वेळवंड खोऱ्यात आहेत. भाटघर धरणाच्या उत्तरेकडील भुतोंडे खोऱ्यात आणि नीरा-देवघर धरणाच्या दोन्ही बाजूच्या हिर्डोशी खोऱ्यात व महाडला जाणाऱ्या वरंधा घाटातही हॉटेल्स आहेत.


वरंधा घाट बंद असल्याच्या पर्यटनावर परिणाम नाही
वरंधा घाटात सर्वाधिक धबधबे असल्यामुळे घाटात पर्यटकांची संख्या जास्त असते. भोरहून महाडला जाणारी वाहतूक बंद असली तरीही पर्यटकांना घाटमाथ्यावरील वाघजाई मंदिरापर्यंत जाता येते. त्यामुळे वरंधा घाट बंद असल्याचा पर्यटनावर काहीही परिणाम होत नाही.


फार्महाऊस, हॉटेलमध्ये या आहेत सुविधा
१. धबधब्याखाली भिजून आल्यावर, जेवण झाल्यावर हॉटेल्सच्या खोल्यांत मिळते ऊब.
२. हॉटेल्सच्या महाराष्ट्रीय, शाकाहारी व मांसाहारी जेवण,
३. पावसाळी खेळ, साहसी खेळ, बालगोपाळांसाठी खेळणी, टीव्हीची सोय
४. २४ तास मदतीसाठी सज्ज कर्मचारी सज्ज.
५. कुटुंबाच्या सुरक्षेची हॉटेल व्यवस्थापकांकडून योग्य काळजी


भोर परिसरातील पर्यटनस्थळे
नसरापूर येथील बनेश्वर मंदिर व धबधबा
केतकावळे येथील बालाजी मंदिर
इंगवली येथील नेकलेस पॉइंट
भाटघर धरण
भोरचा राजवाडा, भोरेश्वर मंदिर, शनीघाट व वाघजाई मंदिर
अंबाडे येथील जानुबाईदेवीचे मंदिर
मांढर येथील काळूबाई मंदिर (मांढरदेवी)
आंबवडे येथील झुलता पूल व नागनाथाचे मंदिर
नीरा-देवघर धरण (मंत्री पॉइंट)
वरंधा घाटमाथा, धबधबे, वाघजाई मंदिर
रायरेश्वर, रोहिडेश्वर (विचित्रगड), कावळागड, केंजळगड आदी किल्ले
भुतोंडे येथील येसाजी कंक व कारी येथील कान्होजी जेधे यांचा वाडा.

तालुक्यात येणाऱ्या पर्यटकांना इतरांकडून किंवा मद्यपींकडून त्रास
होऊ नये, यासाठी तालुका प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत. पोलिसांचे गस्त पथक कार्यरत राहणार असून पर्यटकांनी रस्त्याच्या कडेला, धबधब्याजवळ, धरणाच्या पाण्याजवळ किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करू नये व इतरांना त्रास देवू नये.
- अण्णासाहेब पवार, पोलिस निरीक्षक भोर पोलिस ठाणे

भोरच्या परिसरात पावसाचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या शहरातील हौशी पर्यटकांच्या जेवणाच्या आवडीनिवडींसह सुरक्षीततेच्या उपाययोजनांवर आम्ही लक्ष केंद्रित करीत आहोत. हॉटेलमध्ये आल्यानंतर ते जाईपर्यंतची जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडण्याचे योग्य ते नियोजन केले जाते.
- सायली देशमुख, हॉटेल व्यावसायीक.
05494, 05495, 05496

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate Rummy: कृषीमंत्री कोकाटेंच्या 'रमी' व्हिडिओनंतर ऑनलाईन गेमिंगवर बंदी येणार का? फडणवीस काय म्हणाले होते?

Ahilyanagar: डॉ. आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याचे उपमुख्यमंत्री पवारांच्या हस्ते अनावरण: संग्राम जगताप; २७ जुलैला हाेणार अनावरण

WCL 2025 Video: क्रिकेटमध्ये पुन्हा बॉल-आऊट! द. आफ्रिकेने विंडीजवर मिळवला थरराक विजय

Mumbai News: अनधिकृत बांधकामाला अधिकाऱ्यांचे प्रोत्साहन! न्यायालय अ‍ॅक्शन मोडमध्ये; कारवाईची टांगती तलवार

Yashwant Dange: साडेतीनशे घरांमध्ये डेंगीसदृश अळ्या: यशवंत डांगे; सात हजार घरांना भेटी देत औषधोपचार, ५५० पाणीसाठे नष्ट

SCROLL FOR NEXT