पुणे

भोरमधील विद्यार्थिनींकडून सैनिकांना राख्या, शुभेच्छापत्रे

CD

भोर, ता. २४ : येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय आणि गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी सीमेवरील सैनिकांना शुभेच्छापत्रे आणि आगामी रक्षाबंधन सणानिमित्त राख्या पाठविल्या आहेत. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी स्वतः राख्या बनविल्या आणि स्वहस्ताक्षरात पत्रेही लिहिली. शहरातील महाडनाका परिसरातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या बालसंस्कार उपक्रमांतर्गत दोन्ही विद्यालयांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला.
तालुक्यातील न्यायाधीश पदी निवड झालेले न्यायाधीश अमित साठे आणि गटविकास अधिकारीपदी निवड झालेल्या नेहा चिकणे यांच्या हस्ते वीर जवानांकडे राख्या व शुभेच्छापत्रे पाठविण्यात आली. तालुक्याच्या अतिदुर्गम भागातील साळुंगण या गावातील दादू दूरकर आणि वेनवडी गावातील संतोष चव्हाण हे दोघे जवान भारतीय सैन्यदलात हरियाना राज्यातील अंबाला येथे कार्यरत आहेत. त्यांच्या परिसरातील सैनिकांना या राख्या व शुभेच्छापत्रे पाठविण्यात आली.
श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे सेवेकरी संतोष कदम यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमास माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब समगीर, मुख्याध्यापिका रेखा पाटील, एस.एम. शिकीलगार, संतोष घोरपडे, ज्योती दिक्षीत, कांचन शेळके, वृषाली पाटील, वंदना कुंभार, स्नेहल डाळ, एस.एस. मिरजे आदी उपस्थित होते. जेजुरी देवस्थानचे माजी अध्यक्ष सॉलिसिटर प्रसाद शिंदे यांनी विद्यार्थिनींना कोरी शुभेच्छापत्रे उपलब्ध करून दिली. अमित साठे व नेहा चिकणे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''कॅमेऱ्याचा एँगल नाही, हृदयाचा एँगल बदला'', भर सभागृहात प्रियंका गांधींकडून मोदींवर बोचरी टीका; नेमकं काय म्हणाल्या?

Mumbai Crime: MIDC पोलिसांची मोठी कारवाई, अवैधरीत्या मुंबईत राहणारे ७ बांगलादेशी तृतीयपंथी जेरबंद; सेक्स रॅकेटचाही पर्दाफाश

Kasari Green Revolution: कासारी गावातील ओसाड गायरानात १००० रोपांची लागवड; ५००० झाडांचे लक्ष्य, ठिबक सिंचनासह हरित क्रांतीचा संकल्प

Mumbai News: रेल्वे स्थानकावर मोठा अपघात टळला, उल्हासनगर-अंबरनाथ दरम्यान विचित्र प्रकार; नेमकं काय घडलं?

Chitrakoot Crime News: NEET विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार; चित्रकूटमध्ये ३७४ CCTV, ६ हजार कॉल्स तपासले, मुख्य आरोपी पोलिसांच्या चकमकीत जखमी

SCROLL FOR NEXT