पुणे

भोरच्या २०० गावांतील रस्त्यांना देणार क्रमांक

CD

भोर, ता. १०ः तालुक्यातील सर्व २०० गावांतील नकाशावर उपलब्ध असणाऱ्या रस्त्यांसह वहिवाटीचे पाणंदरस्ते, शिव रस्ते व शेत रस्ते यांची नोंद करून, त्यांना क्रमांक देण्यात येणार आहेत. राज्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर या कालावधीत साजरा करण्यात येणाऱ्या महसूल सप्ताहाच्या पहिल्या टप्यातील ‘पाणंद रस्ता’ या उपक्रमाअंतर्गत रस्त्यांना क्रमांक देण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती तहसीलदार राजेंद्र नजन यांनी सांगितले.
उपअधिक्षक भूमी अभिलेख यांच्याकडून सर्व ग्राम महसूल अधिकारी यांना तालुक्यातील २०० गावांचे गावनकाशे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनादेखील गावस्तरावर ग्रामसभेचे नियोजन करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार पुढील आठ दिवसांत आपल्या सजातील समाविष्ट असणाऱ्या गावामधील ग्रामपंचायत अधिकारी, पोलिस पाटील, कोतवाल यांनी सरपंच व सर्व पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते यांच्या समन्वयाने गावात शिवार फेरी काढून शासन निर्णयातील तरतुदीप्रमाणे नकाशावरील उपलब्ध नांद असलेले ग्रामीण रस्ते, हद्दीचे ग्रामीण रस्ते, ग्रामीण मार्ग (पोटखराबा) पायमार्ग (पोटखराबा) हे प्रपत्र १ मध्ये नोंद घेऊन प्रपत्र १ तयार करणार आहेत. दरम्यान, आदेशित करण्यात आलेले रस्त्यांची नोंद ही प्रपत्र २ मध्ये घेण्याबाबत सूचनाही दिल्या आहेत. उपविभागीय अधिकारी भोर डॉ. विकास खरात यांच्या मार्गदर्शनाखाली उपरोक्त पाणंद रस्त्याबाबतचा कार्यक्रम पूर्ण करण्यात येणार असल्याचेही नजन यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur heavy rain: सोलापुरातील पावसामुळे देगाव ओढ्याला पूर; शेतीचं मोठं नुकसान, पाच तासांत होत्याचं नव्हतं झालं

Balwan Punia: ऑलिंपिक पदक विजेता कुस्तीगीर बजरंग पुनियाच्या यशामागचा आधारस्तंभ हरपला! वडील बलवान पुनिया यांचे निधन

Pune News : सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने जीवन संपवले; पुण्यातील घटना

Pune News : प्रभाग रचनेवर संताप; पुण्यात नागरिकांचा घोषणाबाजीचा धडाका

Neelam Gorhe : शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात डॉ. नीलम गोऱ्हे यांचे कार्यकर्त्यांना लोकप्रतिनिधी होण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT