भोर, ता. २७ : शहरातील वाघजाईनगर परिसरातील मयूर संपत खुंटे (वय १९) या तरुणाने बुधवारी (ता. २६) सायंकाळी गळफास घेऊन केली. त्यानंतर शहरात तणावाचे वातावरण झाले होते. पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई होईपर्यंत कुटुंबाने मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या आश्वासनानंतर मृतदेह शवविच्छेदनास कुटुंबीयांनी तयारी दर्शविली.
मयूर याने पोलिस अधिकाऱ्याने केलेल्या मारहाणीमुळे आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी व दलित संघटनांनी केला आहे. संबंधित पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई केल्याशिवाय तरुणाचा मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास आणि मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबांनी नकार दिला. भोरचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रसिंग गौर यांनीही संबंधित पोलिस अधिकाऱ्याची बदली केली असून, त्याची चौकशी सुरू केली असल्याचे सांगितले. मात्र त्यानंतरही नातेवाइकांनी आणि दलित संघटनेचे कार्यकर्ते अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीवर ठाम राहिले. गुरुवारी (ता. २७) दुपारी रामबाग परिसरात सुमारे पाच तास रास्ता रोको आंदोलन केले. मयताचे नातेवाईक आणि दलित संघटनांनी केलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे रामबाग चौकात भोर- महाड, भोर- मांढरदेवी, भोर- आंबवडे, भोर- शिरवळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. अखेर गुरुवारी (ता. २७) सायंकाळी पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी स्वतः भोरला भेट दिली आणि कुटुंबीयांसह आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. संबंधित पोलिस अधिकाऱ्याची तत्काळ बदली केली असून, त्याची चौकशी सुरू असल्याचे त्यांनी आंदोलनकर्त्यांना सांगितले. शवविच्छेदनानंतर पोलिस अधिकारी दोषी आढळल्यास त्याच्यावर प्रशासकीय पद्धतीने कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची खात्री आंदोलनकर्त्यांना दिली. त्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी घेऊन जाण्यास सहमती दर्शवली. त्यामुळे भोरमधील २४ तासापासून सुरू झालेला तणाव पूर्णपणे निवळला आहे.
06136, 06137, 06138
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.