पुणे

भोरच्या एमआयडीसीसाठी बैठक लावणार : फडणवीस

CD

भोर, ता. १ : ‘‘राज्य सरकारच्या येत्या अधिवेशनात भोरच्या एमआयडीसाठी बैठक लावून हा प्रश्न मार्गी लावतो,’’ असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
भोर नगरपालिका निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. येथील जिजामाता वि‌द्यालयाच्या मैदानावर सोमवारी (ता. १) दुपारी झालेल्या प्रचारसभेस उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी आमदार संग्राम थोपटे, आमदार योगेश टिळेकर, शेखर वडणे, राजेंद्र शिळीमकर, बाळासाहेब गरुड, पोपट सुके, स्वरूपा थोपटे, स्नेहलता दगडे, नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजय जगताप आदींसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘संग्राम थोपटे यांना आजपर्यंत न्याय न मिळाल्यामुळे ते भाजपात आले. त्यांनी आमच्याकडे दोन संकल्पना मांडल्या होत्या. त्यापैकी एक शेतकऱ्यांसाठी हिताच्या असलेल्या राजगड कारखान्याला ४६७ कोटी रुपयांची निधी देवून पूर्ण केली आहे. आणि दुसरी तालुक्यातील रोजगारनिर्मितीसाठी एमआयडी सुरु करणार आहे. एमआयडीसीसाठी जमीनचे अधिग्रहण केल्यानंतर एक इंचही जागा रिकामी ठेवणार नाही. इतके उ‌द्योग आणणार आहे. संग्राम थोपटे तुमच्या पाठीशी मी आणि माझे सरकार आहे. त्यामुळे तुम्ही विकासाची चिंता करू नका. मतदानाच्या एका दिवसाची तुम्ही आमची काळजी घ्या, पुढील पाच वर्षे आम्ही तुमची काळजी घेणार आहे.’’
आमदार संग्राम थोपटे म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री येणार असल्यामुळे विरोधकांच्या तोंडचे पाणी पळाले.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Hotels Closed: मुंबईतील सर्व हॉटेल्स बंद होणार? गॅस तुटवड्यामुळे मोठा फटका, २० टक्के हॉटेल्सना टाळे

शार्दूलची तिसरी पत्नी झाल्यामुळे तुझ्यावर टीका झाली... नेहा पेंडसे थेट उत्तर देत म्हणाली- काही लोकांना वाटतं की...

समान नागरी कायदा लागू करण्याची वेळ आली आहे; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण, मोठी भूमिका मांडण्याचं नेमकं कारण काय?

Iran War Impact: युद्धाचे परिणाम! नाशिकमधल्या ४०० कंपन्या बंद पडण्याच्या मार्गावर; संभाजीनगरमधले उद्योजक म्हणतात, कोरोनासारखी परिस्थिती...

मुलगी झाली हो ! रणदीप-लीनच्या घरी चिमुरडीचं आगमन; लेकीचा पहिला फोटो Viral

SCROLL FOR NEXT