पुणे

आळंदे येथील कबड्डी स्पर्धेत गजराज संघ विजेता

CD

भोर, ता. ३१ ः आळंदे (ता. भोर) येथील एकलव्य क्रिडा संस्थेच्या १२व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एकलव्य कबड्डी लीग स्पर्धेत स्वप्नील जायकर यांच्या गजराज एंटरप्राइजेस संघाने प्रथम क्रमांक पटकवला. मावळा वॉरिअर्स संघाने द्वितीय, तर पै. सिद्देशदादा नांदे फाउंडेशन संघाने तृतीय क्रमांक व तोरणा फायटर संघाने चतुर्थ क्रमांक मिळवला.
तीन दिवसांच्या या स्पर्धेचे स्पर्धेचे उद्‍घाटन शुक्रवारी (ता. २६) सायंकाळी भोर कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत बाठे यांच्या हस्ते झाले. रविवारी (ता. २८) रात्री विजेत्यांना बक्षीसांचे वितरण करण्यात आले.
यावेळी एकलव्य क्रिडा संस्थेचे संस्थापक व्ही. एस. पवार, अध्यक्ष प्रदिप मालुसरे, रणजित शिवतरे, कार्तिक मांडेकर, विक्रम खुटवड, संतोष भिलारे, स्वप्नील कोंडे, सुरेश सोनवणे, सुनील धाडवे, शांताराम मालुसरे, किशोर थोपटे उपस्थित होते.
या स्पर्धेसाठी आमदार शंकर मांडेकर, अक्षय सोनवणे, स्वप्नील पांगारे, प्रशांत सोनवणे, अमोल पांगारे, सचिन बांदल, प्रवीण धावले, सारिका मालुसरे, परशुराम मालुसरे, असिफ शेख, दशरथ जाधव, विकास मालुसरे, अनिकेत आहिरे, अक्षय धाडवे, सुलोचना शिंदे यांनी आर्थिक सहकार्य केले. स्पर्धेत जय गव्हाणे यास सर्वोत्कृष्ट खेळाडू, पियुष भिलारे यास उत्कृष्ट चढाई, तर कुणाल थोपटे यास उत्कृष्ट पकड पुरस्कार देण्यात आला. याशिवाय शौर्य खोपडे, साहिल धोत्रे व ओम डोर्लेकर या खेळाडूंना विशेष पुरस्कार देण्यात आले. विजेत्या संघांना ट्रॉफी, सन्मानपत्रासह रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेदरम्यान घेण्यात आलेल्या लकी ड्रॉ मध्ये ओंकार चव्हाण यांना एलईडी टिव्ही मिळाला. नंदा कारभळ यांना गॅस शेगडी, आदिती सणस यांना मिक्सर, तर संद्या नांदे यांना कुकर मिळाला.

06261

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharat Taxi Cab Service : ‘ओला-उबर’ला मिळणार जबरदस्त टक्कर!, देशभरात आजपासून ‘भारत टॅक्सी’ कॅब सेवा सुरू

New York: न्यूयॉर्क शहराला मिळाला पहिला मुस्लिम महापौर; कुराण हातात घेऊन घेतली शपथ

KYV Process: वाहनधारकांना मोठा दिलासा! FASTag नियमात महत्त्वाचा बदल; डिजिटल टोल व्यवस्थेत सुधारणा

Chh. Sambhaji Nagar News : फुलंब्री निवडणुकीत जादूटोण्यामुळेच निवडणुकीत पराभव; शिवसेना उमेदवाराचा गंभीर आरोप!

Alandi Election : आळंदी नगरपरिषदेतील गटनेता, उपनगराध्यक्ष आणि स्विकृत सदस्य निवडीसाठी चर्चासत्र सुरु!

SCROLL FOR NEXT